आरोग्य मंत्रा

Summer Tips : तुम्ही सुद्धा उन्हाळ्यात थंड पाणी पिता का? जाणून घ्या...

उन्हाळ्यात थंड पाणी पिण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या आणि आरोग्यदायी पर्याय शोधा.

Published by : Team Lokshahi

डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे

पाणी म्हणजे जीवन असते. आपण पाण्याशिवाय जीवनाची कल्पना करु शकत नाही. पिण्याचे पाणी नेहमी स्वच्छ आणि शुद्ध असावे. आरोग्याबाबत जागरुक असणाऱ्या लोकांना नेहमी हा प्रश्न पडतो की, पाणी गरम प्यावे की थंड प्यावे? विशेषतः उन्हाळ्यात हा प्रश्न अधिक अवघड होतो. सध्या घराघरात वॉटर प्युरिफायर ( Water Purifiers) किंवा फिल्टर (Water Filter) बसवलेला असतो. त्यामुळे फिल्टरची सर्व्हिसिंग एकदा केली म्हणजे फिल्टर स्वच्छ होतो असा आपला समज आहे. फिल्टरचे काम फक्त पाणी गाळण्याचे असल्याने ते पाणी स्वच्छ करत नाही. त्याच्यासाठी पाणी गरम करुनच प्यावे लागते.

पाणी गरम का करावे?

स्वयंपाक करताना भाजी, खिचडी, आमटी वैगेरे शिजवताना आणखीन पाणी टाकण्याची गरज पडते. त्यावेळेस आपण नळाचं थंड पाणी टाकत नाही तर, उकळत गरम पाणी टाकतो. कारण त्यामुळे भाजी छान शिजते त्याचबरोबर भाजीची चव अजून वाढते. मात्र आपण थंड पाणी पितो. पाणी नेहमी 20- 25 मिनिट उकळल्यानंतर पिण्यायोग झाल्यानंतर प्यायल्यास अन्न लवकर पचते. अशी आयुर्वेदाची मान्यता आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा