आरोग्य मंत्रा

गरोदरपणात बाळाची काळजी ऍलोपॅथी औषधांनी नाही तर आयुर्वेदीक औषधांनी घ्या...

सुरुवातीपासूनच ऍलोपॅथीची औषधं सूट होत नाहीत. गर्भधारणामुळे डॉक्टरांनी कॅल्शियम, लोह, वगैरे पूरक दिलेली आहेत.

Published by : Dhanshree Shintre

डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे

सुरुवातीपासूनच ऍलोपॅथीची औषधं सूट होत नाहीत. गर्भधारणामुळे डॉक्टरांनी कॅल्शियम, लोह, वगैरे पूरक दिलेली आहेत. पण त्यामुळे बद्धकोष्ठता होतं. याला पर्याय म्हणून काही आयुर्वेदिक औषधं असतात का?

गर्भधारणामध्ये कॅल्शियम, लोह, हिमोग्लोबिन वगैरे सर्व गोष्टींचं प्रमाण योग्य राहण्यासाठी आयुर्वेदिक औषधं घेता येतात. त्यांना संपूर्ण गर्भधारणामध्ये एकही ऍलोपॅथी औषध घेण्याची गरज पडत नाही. फक्त आयुर्वेदाचं औषध घेऊन स्वतःचं आणि बाळाचं आरोग्य उत्तम राहू शकतं. मुळात आयुर्वेदातील सगळी औषधं सेंद्रिय म्हणजे नैसर्गिक गोष्टींपासून बनवलेली असतात. त्यामुळे त्यांचा शरीराकडून अगदी सहजपणे स्वीकार होऊ शकतो आणि मुख्य म्हणजे ती अंगी लागतात.

पारंपारिक औषधांमुळे बऱ्याचदा काय होतं? तर रिपोर्टमध्ये सुधारणा होते पण त्रास मात्र कमी होत नाही. आयुर्वेदिक औषधांनी मात्र हिमोग्लोबिन, कॅल्शियम, फॉलिक ऍसिड वगैरे सर्व गोष्टी श्रेणीमध्ये तर राहतातच पण आतली शक्ती सुद्धा वाढते, बाळापर्यंत व्यवस्थित पोचते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचे कोणतेही दुष्परिणाम नसतात.

गर्भधारणाच्या नऊ महिन्यांमधला प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण तुम्ही आनंदाने घालवू शकता. आयुर्वेदातील प्रवाळपंचामृत, कामदुधा, ताप्यादी लोह यासारखी औषधं, सकाळी पंचामृत, डिंक-खारकेचं दूध, अंजीर, तुपासह खजूर, डाळिंब असा आहार घेण्याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा