आरोग्य मंत्रा

बिनधास्त खा मसालेदार पदार्थ; होतात 'हे' अनोखे फायदे

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Spicy Food : मसालेदार अन्न आरोग्यासाठी खूप हानिकारक असते, असे अनेकदा सांगितले जाते. पण, तुम्हाला माहिती आहे का ते आरोग्यासाठी फायदेशीर देखील आहे. ज्या लोकांना मसालेदार आणि तिखट पदार्थ आवडतात त्यांनी काळजी करण्याची गरज नाही कारण त्याचे अनेक फायदे आहेत. चला तर मग जाणून घेऊया...

त्वचेसाठी फायदेशीर

मसालेदार अन्नामध्ये सूक्ष्मजीव घटक असतात. जे बॅक्टेरिया आणि इन्फेक्शन दूर ठेवते. लसूण, वेलची, जिरे, आले, लवंग आणि लेमन ग्रास खाल्ल्याने त्वचा उजळते. त्वचेचा संसर्गही दूर होऊ लागतो.

तणाव दूर होतो

मसालेदार अन्नामुळे अनेक समस्या दूर होतात. मसालेदार अन्न खाल्ल्याने शरीरात एंडोर्फिन आणि डोपामाइनची पातळी वाढू लागते. यामुळे तणावही कमी होतो.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते

लाल मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी, बी-व्हिटॅमिन, प्रो-ए-व्हिटॅमिन आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात. जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्याचे काम करते. लाल मिरची खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते.

दीर्घायुष्यासाठी फायदेशीर

मसालेदार अन्न खाल्ल्याने छातीत जळजळ होऊ शकते. पण ते खाल्ल्याने आयुष्यही वाढते. मसालेदार अन्न खाल्ल्याने आयुष्य १४ टक्क्यांनी वाढते. त्यामुळे मसालेदार अन्न वाईट नसून चांगले मानले जाते.

कॅप्सेसिन आरोग्यासाठी फायदेशीर

प्रोस्टेट कॅन्सर रोखण्यासाठी कॅप्सेसिन फायदेशीर मानले जाते. त्यात अनेक प्रकारचे गुण आढळतात. शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कॅप्सेसिनच्या माध्यमातून बरे करता येते. तसेच रक्ताभिसरण सुधारते. पाठीच्या खालच्या भागात दुखणे आणि ऑस्टियोआर्थरायटिसच्या वेदना कमी करण्यात कॅप्सेसिन महत्त्वाची भूमिका बजावते.

Aaditya Thackeray : मतदानाचा हक्क बजावल्यानंतर आदित्य ठाकरे फोटो शेअर करत म्हणाले...

Ashish Shelar : एवढी घबराट आणि पळपुटेपणा उद्धवजी तुमच्या पक्षाचा असेल तर रिंगणातून बाहेरच जा

Sanjay Raut : निवडणूक यंत्रणा, निवडणूक आयोग हा पूर्णपणे सत्ताधारी पक्षाच्या पकडीत आहे

मतदानाच्या हक्क बजावल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Cm Eknath Shinde : बोगस मतदान आणण्याची आम्हाला आवश्यकता काय आहे? आज संपूर्ण मतदार जो आहे महायुतीच्या प्रेमात आहे