कोरोनाच्या या महामारीमुळे सारं जग सावरलेलं असतानाच आता पुन्हा देशात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती मिळत आहे. यातच आता कोरोना पुन्हा एकदा आल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनमुळे धोका वाढला असल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येमध्ये सौम्य वाढ होत असून 23 मे रोजी एकूण 45 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबईत सर्वाधिक 35 रुग्ण, पुण्यात 4, कोल्हापूर व रायगड येथे दोन तर ठाणे व लातूर येथे एक असे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे 22 मेपर्यंत मुंबईतील एकूण कोरोना रुग्णसंख्या 183 वर पोहोचली आहे.
जानेवारी 2025 पासून राज्यात एकूण 6819 कोविड चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी 210 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात एकट्या मुंबईत 183 रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत 81 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या असलेल्या सक्रिय रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने ते घरीच उपचार घेत आहेत.