आरोग्य मंत्रा

Health Tips : दूध नकोय? मग हाडांसाठी 'हे' शाकाहारी पर्याय नक्की ट्राय करा

दूध न पिता देखील तुम्ही कॅल्शियमची पूर्तता करू शकता, तेही चविष्ट आणि नैसर्गिक अन्नपदार्थांमधून. जाणून घ्या...

Published by : Team Lokshahi

हाडं मजबूत ठेवण्यासाठी सर्वात महत्वाचं पोषक तत्त्व म्हणजे कॅल्शियम. अनेक वर्षांपासून आपण ऐकत आलोय की, “दूध प्या, हाडं मजबूत राहतील.” हे खरं असलं तरी, सर्वांनाच दूध पिणं आवडतं असं नाही. काहीजणांना त्याची चव नकोशी वाटते, काहींना पचनाचा त्रास होतो, तर लहान मुलं दूध प्यायला नाक मुरडतात. अशावेळी एकच प्रश्न उरतो हाडं मजबूत कशी ठेवायची? दूध न पिता देखील तुम्ही कॅल्शियमची पूर्तता करू शकता, तेही चविष्ट आणि नैसर्गिक अन्नपदार्थांमधून.

तीळ

100 ग्रॅम तिळामध्ये तब्बल 975 मिग्रॅ. कॅल्शियम असतं. रोज फक्त 1 चमचा तीळ खाल्लं तरी शरीराला कॅल्शियमचा चांगला पुरवठा होतो. तीळ लाडू, चटणी, किंवा पराठ्यात वापरून सहज आहारात घालता येतो.

हिरव्या पालेभाज्या

पालक, मेथी, चौळी, सरसो यांसारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं. दररोजच्या जेवणात यांचा समावेश केल्यास हाडांची घनता टिकून राहते.

बदाम

भिजवलेले बदाम हे फक्त बुद्धिवृद्धीसाठी नव्हे, तर कॅल्शियमसाठीही उपयुक्त आहेत. दररोज 56 बदाम खाल्ले तर शरीराला प्रोटीन, व्हिटॅमिन ईसह कॅल्शियमही मिळतं.

अंजीर

2 सुके अंजीर म्हणजे सुमारे 65 मिग्रॅ. कॅल्शियम. अंजीर साखरेऐवजी गोडासाठी वापरता येतो आणि स्नॅक म्हणूनही योग्य आहे.

सोया

सोया मिल्क आणि सोया चंक्स हे दूधाचे उत्तम पर्याय आहेत. लॅक्टोज इंटोलरंट लोकांसाठी ते सुरक्षित असून, त्यात चांगलं प्रमाणात कॅल्शियम असतं.

चिया सीड्स

या छोट्या बियांनी आरोग्यविश्वात मोठं स्थान मिळवलं आहे. दुधात, पाण्यात, फ्रुट बाऊलमध्ये किंवा डेसर्टमध्ये वापरून चिया सीड्सचा आहारात सहज समावेश करता येतो.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Shubman Gill : शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये ऐतिहासिक दुहेरी शतक; भारतीय क्रिकेटसाठी नवा अध्याय