डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे
दातदुखीवर आराम मिळवण्यासाठी अनेकजण वेगवगळे उपाय करतात. दातदुखीवर घरगुती उपचार करुन तुम्ही आराम मिळवू शकता. बाभूळ साल, खदीर साल, बकुळ साल, लोध्र, ज्येष्ठमध, तुरटीची लाही, भीमसेनी कापूर, थोडसं सैंधव अशा कडू, तुरट, तिखट चवीच्या द्रव्यांपासून दंतमंजन बनवता येऊ शकतं.
अशा दंतमंजनामुळे दात तर स्वच्छ होतातच, पण हिरड्या मजबूत होतात. रात्रभरात कंठात, मुखात साठलेला कफ दोष सुटा होऊन निघून जायला मदत होते.
या दंतमंजनामुळे दातांचं आरोग्य जपलं जाईल, शिवाय सकाळी दिवस सुरू होताना आणि रात्री दिवस संपताना या दंतमंजनाचा तुम्ही वापर करु शकता यामुळे दातदुखीवर तुम्ही आराम मिळवू शकता.