आरोग्य मंत्रा

Pregnancy Health Tips : गर्भवतीच्या आरोग्यासाठी आवश्यक आहार काय? जाणून घ्या

गर्भवती स्त्रीवर स्वतःच्या शरीराच्या बरोबरीनी, गर्भाशयात कलेकलेनी वाढणाऱ्या बाळाच्या पोषणाचीही जबाबदारी असते. यामुळे गर्भसंस्कारात गर्भवतीच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं समजलं जातं.

Published by : Prachi Nate

गर्भवती स्त्रीवर स्वतःच्या शरीराच्या बरोबरीनी, गर्भाशयात कलेकलेनी वाढणाऱ्या बाळाच्या पोषणाचीही जबाबदारी असते. यामुळे गर्भसंस्कारात गर्भवतीच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं समजलं जातं. आयुर्वेदानुसार गर्भाचं पोषण व्यवस्थित होण्याची जबाबदारी मुख्यत्वे गर्भवतीच्या रसधातूवर असते. आपलं शरीर ज्या सप्तधातूंपासून बनलेलं असतं, त्यातला पहिला धातू म्हणजे रसधातू. आपण उन्हातान्हातून थकून घरी आलो आणि थोडसं जरी पाणी प्यायलो की जी तृप्ती मिळते, समाधान होतं, तशी तृप्ती उरलेल्या सहाही धातूंना देण्याचं काम रसधातू करत असतो.

याच रसधातुवर गर्भाशय तसंच स्तन्याशयाच्या आरोग्याची मुख्यत्वे जबाबदारी असल्यामुळे गर्भाचं योग्य प्रकारे पोषण होण्यासाठी गर्भवतीच्या रसधातूकडे लक्ष देणं गरजेचं असतं. आजकाल बऱ्याचदा गर्भोदक कमी, ज्याला सामान्य भाषेत ‘पोटातलं पाणी कमी होणं’ असं म्हणतात, ते झाल्याचं आढळतं. याचाही संबंध रसधातूशी असतो. रस या शब्दातूनच त्याचं पोषण कशातून होणार आहे, हे समजतं. रसरशीत असणाऱ्या गोष्टी रस धातूचं पोषण करण्यास समर्थ असतात. फळांचे रस, विशेषतः शहाळं, नारळाचं पाणी, नारळाचं दूध, मोसंबीचा ताजा रस, डाळिंबाचा रस, दूध अर्थात A2 गाईचे शुद्ध दूध, सुवर्णसिद्ध जल, साळीच्या लाह्या रात्रभर भिजत घालून गाळून घेतलेलं पाणी, ऊस, द्राक्षं अशा सगळ्या भरपूर रस असणाऱ्या गोष्टी रस धातूचं पोषण करण्यासाठी उत्तम असतात.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली

Mukhyamantri Samruddha Panchayatraj Abhiyan : राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविणार

Gautam Gambhir : गौतम गंभीर आणि 'द ओव्हल' मैदानाचे मुख्य क्युरेटर ली फोर्टिस यांच्यात जोरदार राडा; VIDEO व्हायरल

Mumbai : चीनवरून आलेली निकृष्ट दर्जाची खेळणी व बनावट सौंदर्य प्रसाधने जप्त