WHY YOU DROOL WHILE SLEEPING | CAUSES, HEALTH TIPS AND LIFESTYLE REMEDIES 
आरोग्य मंत्रा

Health Care Tips : गाढ झोपेत तोंडातून लाळ गळण्याचे कारण काय? जाणून घ्या कारण

Sleep Drooling: गाढ झोपेत तोंडातून लाळ गळणे सामान्य आहे, पण सतत होत असल्यास आरोग्य समस्येचे संकेत असू शकतात.

Published by : Dhanshree Shintre

साखरेपेक्षा गोड तर झोप गोड, पण आजकालच्या धावपळीच्या जीवनात बहुतेकांची झोप अपूर्ण राहते. याचा थेट परिणाम शरीरावर होतो आणि अपुऱ्या झोपेचे दुष्परिणाम हळूहळू प्रकट होतात. त्यातील एक सामान्य समस्या म्हणजे गाढ झोपेत तोंडातून लाळ गळणे. ही समस्या अनेकांना भेडसावते आणि ती शारीरिक चक्रातील असंतुलनाचा संकेत असते. आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, ही कोणती गंभीर आजार नाही, पण अपुऱ्या झोपेचा परिणाम आहे.

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, दिवसभराच्या कामकष्टामुळे शरीर आणि मेंदू थकतात. रात्री झोपेची तीव्र गरज असते, पण चुकीची झोपण्याची स्थिती यात अडथळा आणते. कुशीवर किंवा पोटावर झोपण्याच्या सवयीमुळे तोंडातून लाळ गळते. अ‍ॅलर्जीमुळे सर्दी किंवा सायनसचा त्रास असल्यास श्वास घेण्यास अडचण येते, त्यामुळे तोंड उघडे ठेवून झोपावे लागते आणि लाळ गळून उशी ओली होते. आम्लपित्त, पचनाचे विकार किंवा जास्त तिखट-तेलकट आहार यामुळेही लाळेचे प्रमाण वाढते.

काही औषधांचे दुष्परिणाम, दात किंवा हिरड्यांचे आजार, घशाची सूज यांनाही हे कारणीभूत ठरू शकते. लहान मुलांमध्ये दात येण्याच्या काळात किंवा खोल झोपेमुळे लाळ गळणे नैसर्गिक असते. मात्र, जर ही समस्या रोज आणि जास्त प्रमाणात होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तज्ज्ञ सांगतात की, ही समस्या सतत राहिल्यास अंतर्निहित आरोग्य समस्या दर्शवू शकते.

या समस्येवर प्राथमिक उपाय सोपे आहेत. पाठीवर झोपण्याची सवय लावा, झोपण्यापूर्वी जड जेवण टाळा, नाक स्वच्छ ठेवा, सर्दी-सायनसवर उपचार घ्या आणि तोंड-दातांची योग्य स्वच्छता राखा. थोडक्यात, गाढ झोपेत लाळ गळणे कधीतरी घडले तरी सामान्य आहे, पण सतत होत असल्यास दुर्लक्षू नका. पुरेशी झोप आणि योग्य जीवनशैली हीच खरी किल्ली आहे.\

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा