CSK Vs. LSG: IPL च्या 15व्या (IPL 2022) हंगामातील आज 7वा सामना आज पार पडणार आहे. हा सामना चेन्नई सुपरकिंग्स विरूद्ध लखनौ सुपरजायंट्स (CSK Vs. LSG) असा असणार आहे. आजचा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न मैदानात (Brabourne Stadium, Mumbai) पार पडेल. ह्या दोन्ही संघांचा 2022 च्या IPL हंगामात प्रत्येकी एक-एक सामना झाला आहे. तर, हे दोन्ही संघ आपला पहिला सामना गमावल्यामुळे आजचा सामना जिंकण्याच्या हेतूने मैदानात उतरणार आहेत.
दरम्यान, आज दोन्ही संघांकडून कोणते खेळाडू खेळतील हे आज सायंकाळी 7 नंतरच स्पष्ट होईल. परंतू, संभाव्य 11 खेळाडूंची यादी खालील प्रमाणे:
चेन्नईचे संभाव्य 11 खेळाडू:
ऋतुराज गायकवाड, रॉबीन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायडू, रवींद्र जाडेजा (कर्णधार), एमएस धोनी (विकेटकीपर), शिवम दुबे, मिचेल सँटनर, ड्वेन ब्राव्हो, अॅडम मिल्ने, तुषार देशपांडे
लखनौचे संभाव्य 11 खेळाडू:
केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), मनिष पांडे, एविन लुईस, कृणाल पंड्या, दीपक हुडा, आयुष बडोनी, आवेश खान, मोहसीन खान, रवी बिश्नोई, दुश्मिंता चमिरा