Vidharbha

पश्चाताप दिन! लग्नाच्या वाढदिवसासाठी केला सुट्टीचा अर्ज; अर्जाची प्रत होतेय तुफान व्हायरल

Published by : left

सुरज दाहाट, अमरावती | अमरावती (Amravati) शहरात सध्या एक लेटर सोशल मिडीयावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे. यात व्हायरल होण्यासारख अस काय आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.याचं उत्तर असं आहे की, पोलीस अंमलदाराने (Police officer) लग्नाच्या वाढदिवसासाठी (Marriage anniversary) सुट्टीसाठी केलेला अर्ज. हा अर्ज नेमका काय केलाय तो वाचूयात…

अमरावती (Amravati) जिल्ह्यातील मंगरुळ दस्तगिर पोलीस स्टेशनला (Mangrul Dastagir Police Station) कार्यरत विनोद राठोड या पोलीस अमलदाराचा २९ मार्च रोजी लग्नाचा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त २७ मार्चची साप्ताहिक रजा २९ मार्चला बदली करून द्यावी अशी विनंती करणारा अर्ज त्यांनी ठाणेदाराला लिहीला होता. विषेश म्हणजे या अर्जात सुट्टीसाठी हव्या असलेल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या कारणासमोर कंसात पश्चाताप दिन असा उल्लेख केला. लग्नाला पश्चाताप दिन असा उल्लेख केल्याने या अर्जाची एकच चर्चा आहे.

पोलीस दलातील या विशेष विनंती अर्जाची सध्या सर्वत्र चर्चा होते आहे.अर्जाची ही प्रत सर्वत्र व्हायरल होत असून या प्रकाराची चर्चा संपूर्ण पोलिस दलात आता रंगू लागली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा