अध्यात्म-भविष्य

Daily Horoscope 12 January Rashi Bhavishya : 'या' राशींना प्रवास लाभदायक; पाहा तुमचे भविष्य

आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? जाणून घ्या राशीभविष्य.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मेष (Aries Horoscope Today) : झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. सहकुटूंब सामाजिक कार्य केल्याने प्रत्येकजण आनंद आणि निवांत राहील. आजच्या सायंकाळी काहीतरी खास योजना आखा. व्यावसायिकांना चांगला दिवस. तातडीचा प्रवास हा लाभदायक.

वृषभ (Taurus Horoscope Today) : धन लाभ होण्याची शक्यता. आजच्या दिवशी कामाचा ताण कमी असेल, त्यामुळे तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल. एखाद्या सहलीच्या ठिकाणी जाऊन जीवनात आनंद आणाल. कामाच्या ठिकाणी प्रश्न सोडविण्यासाठी तुमची बुद्धिमत्ता आणि वजन वापरण्याची गरज आहे.

मिथुन (Gemini Horoscope Today) : आर्थिक स्थिती सुधारेल. घराच्या सुशोभीकरणाऐवजी मुलांच्या गरजांकडेदेखील लक्ष देणे महत्त्वाचे आहे. भागीदाराशी काहीही व्यवहार करणे, त्याच्याशी बोलणे कठीण होऊन बसेल. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील.

कर्क (Cancer Horoscope Today) : धन लाभ होण्याची शक्यता. कुटुंबाकडून तुमचे कौतुक होईल. तुमच्या आयुष्यापेक्षाही तुम्ही ज्या व्यक्तीवर अधिक प्रेम करता ती व्यक्ती भेटेल. दोन ओळींमध्ये दडलेला अर्थ समजल्याशिवाय कोणत्याही व्यावसायिक, कायदेशीर कागदपत्रांवर सही करू नका.

सिंह (Leo Horoscope Today) : दीर्घकालीन, प्रलंबित गुंतवणूक टाळा. प्रलंबित प्रस्तावांची अंमलबजावणी होईल. कार्य क्षेत्रात कुठल्या कामात खराबी असण्यामुळे तुम्ही आज चिंतीत राहू शकतात. आज गुलाबांचा रंग अधिक लाल दिसेल आणि व्हायोलेट्ससुद्धा गडद निळे दिसतील, कारण प्रेमाची नशा तुम्हाला भरपूर चढणार आहे.

कन्या (Virgo Horoscope Today) : आर्थिक पारितोषिक मिळेल. एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचा विचार पुढे येईल. अन्य देशांतील लोकांशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सध्याचा काळ अतिशय योग्य. आज तुम्हाला एक असा अनुभव मिळणार आहे, ज्याने तुम्ही आयुष्यातील दु:ख विसरून जाल.

तूळ (Libra Horoscope Today) : खर्च करताना उधळपट्टी करू नका. मनोरंजनाच्या कार्यक्रमाची व्यवस्था करा. वैयक्तीक मार्गदर्शन तुमचे नातेसंबंध सुधारतील. तुमच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव आल्याने तुमचे ओझे कमी झाल्यासारखे वाटेल. तुमचा जोडीदार हा देवदूतच आहे, आणि याची आज तुम्हाला जाणीव होईल.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today) : धनलाभ संभवतो. काही नवे मित्र जोडाल. अन्य देशांतील लोकांशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सध्याचा काळ अतिशय योग्य आहे. पत्नीकडून कदाचित काही सरप्राईझ मिळण्याची शक्यता आहे.

धनु (Sagittarius Horoscope Today) : आकांक्षा आणि महत्वाकांक्षाना धक्का लागण्याची शक्यता. अतिखर्च होईल. तुमच्या ज्ञानलालसेपोटी नवीन मित्र जोडाल. घरगुती पातळीवर काही अडचणी निर्माण होतील. आजचा दिवस उच्च कामगिरीचा आणि उच्च वर्तुळात वावरण्याचा आहे.

मकर (Capricorn Horoscope Today) : आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. घरातील वातावरणात तुम्ही उपयुक्त बदल कराल. नवीन उपक्रम, उद्योग हा आकर्षक आणि योग्य परतावा मिळण्याबाबत आशादायी असेल. संध्याकाळी तुमच्या जोडीदारासाठी काहीतरी खास प्लॅन करा.

कुंभ (Aquarius Horoscope Today) : धन लाभ होण्याची शक्यता. पाहुण्यांशी असभ्य वर्तन करू नका. इतरांना आपणाकडून प्रमाणाबाहेर अपेक्षा राहतील. कोणी गैरफायदा घेत नाहीत ना हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे. दोन वेगवेगळ्या दृष्टीकोनांमुळे तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मीन (Pisces Horoscope Today) : पैशांची कमतरता घरात कलहाचे कारण बनू शकते. घरातील सदस्यांच्या विविध अडचणींवर मात केल्यास तुम्ही सहजपणे ध्येय गाठू शकाल. चांगल्या करिअरसाठी स्वीकारलेला मार्ग कार्यान्वित करायला हरकत नाही. आपल्या संभाषणाबाबत, बोलण्याबाबत कायम स्पष्ट असावे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा