अध्यात्म-भविष्य

Daily Horoscope 18 September Rashi Bhavishya : हरतालिका पुजेदिनी कसे असेल तुमचे भविष्य? पाहा

आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? जाणून घ्या राशीभविष्य.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मेष (Aries Horoscope Today) : प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. पैशांची चणचण भासेल. वादविवाद, दुसऱ्यावर तोंडसुख घेणे आणि इतरांमधील दोष शोधत राहणे टाळा. प्रेमाची उणीव भासणारा दिवस. भागीदारी तत्त्वावर नवीन व्यवसाय सुरू करायला चांगला दिवस. सर्वांनाच चांगला फायदा होऊ शकतो. कुटुंबांमध्ये वेळ घालवणे पसंत करतील.

वृषभ (Taurus Horoscope Today) : आर्थिक अडचणी टाळण्यासाठी सांभाळून खर्च करा. कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा. सायंकाळी तुम्ही जर तुमच्या मित्र/मैत्रिणीबरोबर बाहेर जाताल. धाडसाने उचलेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. जोडीदार आज अत्यंत उत्साहपूर्ण असेल.

मिथुन (Gemini Horoscope Today) : कामाच्या ताणामुळे तुम्ही त्रासून जाल. सतत अर्थपुरवठा होत राहील. तुम्ही तुमच्या घरची कर्तव्ये बजावण्याकडे दुर्लक्ष केले तर तुमचा जोडीदार वैतागून जाईल. सुयोग्य कर्मचाऱ्यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल. आज तुम्हाला अचानक कुठे यात्रेवर जावे लागू शकते.

कर्क (Cancer Horoscope Today) : यशप्राप्ती होणार. तुमच्या माता पक्षाने आज तुम्हाला धन लाभ होण्याची शक्यता. तुमच्या मुलांसमवेत वेळ घालवा. प्रकृतीस बरे वाटेल. तुमच्या कामावर लक्ष केंद्रीत केलेत तर यश चालत येईल. प्रकाशझोतात याल. तुमच्या मानसिक तणावामुळे आणि कोणतेही कारण नसताना तुम्ही तुमच्या जोडीदाराशी कदाचित वाद घालाल.

सिंह (Leo Horoscope Today) : धन लाभ होण्याची शक्यता. पोस्टाने आलेले पत्र संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी बातमी घेऊन येईल. कुणीतरी खास व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल. कामाच्या ठिकाणा आज तुमचा दिवस आहे. जीवनकडून सरप्राइझ मिळण्याची शक्यता.

कन्या (Virgo Horoscope Today) : आर्थिक लाभ होतील. चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी बोलू नका. तुम्ही प्रेम करीत असलेल्या व्यक्ती दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्या. नियमित कष्टांचे आज चांगल चीज होईल. रिकामा वेळ आज व्यर्थ वादामुळे खराब होऊ शकतो.

तूळ (Libra Horoscope Today) : आर्थिक स्थिती सुधारेल. घरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. तुमच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव आल्याने तुमचे ओझे कमी झाल्यासारखे वाटेल समाधानकारक परिणामांसाठी सर्व कामचे नीट आयोजन करा. कार्यालयीन कामकाज मार्गी लावताना तुमच्यावर ताण तणावाचे मळभ असेल.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today) : खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यावसायिकांना चांगला दिवस. व्यवसायाच्या निमित्ताने आखलेला तातडीचा प्रवास हा लाभदायक आणि सकारात्मक फळ देणारा ठरेल. कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. फिरायला जाण्याचा प्लॅन बनवलं.

धनु (Sagittarius Horoscope Today) : दुधाच्या व्यवसायाने जोडलेले आहे त्यांना आज आर्थिक लाभ होण्याची प्रबळ शक्यता. घरातील कामं पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. कठोर परिश्रम आणि योग्य प्रयत्नांमुळे चांगले फळ मिळू शकते. आज तुम्ही सर्व नातेवाईकांपासून दूर होऊन एकांतात वेळ घालवाल.

मकर (Capricorn Horoscope Today) : उघडयावरचे अन्नसेवन करताना विशेष काळजी घ्या. शेअर बाजारात नुकसान संभवते. वेळेवर सचेत राहणे तुमच्यासाठी उत्तम असेल. मोकळ्या वेळेचा उपयोग करून कुटूंबातील सदस्यांना मदत करा. परगावी प्रवास फारसा आरामदायी नसेल, पण त्यामुळे नवीन महत्त्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास मदत होईल.

कुंभ (Aquarius Horoscope Today) : आर्थिक लाभ होण्याची शक्यता. तुमच्या खेळकर-खोडकर स्वभावामुळे अवतीभवतीचे वातावरण प्रसन्न बनेल. कामातील दबावामुळे मानसिक अशांती वाढेल. दिवसाच्या उत्तरार्धात आराम करा. तुमच्या जोडीदाराचे नातेवाईक तुमच्या वैवाहिक आयुष्यातील शांतता भंग करतील.

मीन (Pisces Horoscope Today) : तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. आज तुम्ही आपल्या घरातील सदस्याला कुठे फिरायला घेऊन जाऊ शकतात खर्चांवर नियंत्रण ठेवा. नव्या घटनांवर लक्ष केंद्रीत करा, आपल्या मित्रांकडून मदत मिळवा. जोडीदार आज अत्यंत उत्साहपूर्ण असेल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Shirsat Special Report : सामाजिक न्याय विभाग पुन्हा वादात, टेंडर प्रक्रियेत नियमांची पायमल्ली?

Latest Marathi News Update live : 'ज्यांना सगळं काही दिलं ते गद्दार झाले'; आदित्य ठाकरेंचा शिंदे गटाला टोला

Tesla's First Showroom In BKC : भारतात टेस्लाची एंट्री; मुंबईतील बीकेसी येथे सुरू होणार पहिलं शोरूम

Monika Bhadoriya : 'तारक मेहता...'मधील अभिनेत्रीनं निर्मात्याच्या 'त्या' आक्षेपार्ह विधानामुळं केला जीवन संपवण्याचा विचार; घडलं असं की....