Weekly horoscope Team Lokshahi
राशी-भविष्य

Weekly Rashi Bhavishya in Marathi 'या' राशीच्या लोकांसाठी हा आठवडा लाभदायक

Published by : Vikrant Shinde

24 एप्रिल ते 30 एप्रिल हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल, हे जाणून घ्या प्रमोद अरुणराव जोशी गुरुजींकडून…

मेष (Aries Horoscope):

मेष राशी जातकांना हा सप्ताहातील सुरवातीचा काळ वादग्रस्त परिस्थिती चा ठरेल, शत्रु मार्फत अनेक प्रकारचे त्रास होण्याची संभावना -परंतु वाद विवाद टाळणे या वर उत्तम पर्याय ठरेल. नोकरी क्षेत्रात आपले काम कसे पुढे नेता येईल या कडे लक्ष केंद्रित केले तर हा सप्ताह फायद्याचा असू शकेल लक्ष्यपूर्वक आणि शांतता ,संयमाने घेतले निर्णय महत्वाचे ठरतील.

वृषभ (Taurus Horoscope):

वृषभ राशी जातकांना हा सप्ताह दुसर्यांना सल्ला देणे घातक ठरू शकेल,नाराजीचे प्रसंग ओढवतील , आपण बोलताना कमी शब्द बोलून विषय कसा संपेल या कडे लक्ष्य दिले तर फायदेशीर राहील,सप्ताह अधिक न बोलणे हे फायद्यांचे ठरेल ,प्रवास करताना काळजी घ्यावी.

मिथुन (Gemini Horoscope):

मिथुन राशी जातकांना हा सप्ताह आर्थिक प्रकारे फायदा करून देणारा ठरेल . मित्र /आप्तेष्ट मार्फत लाभ होईल. अनेक वर्षे हाती घेतलेले काम या सप्ताह मध्ये पूर्ण होताना दिसून येईल परंतु त्या मध्ये सुद्धा अगदी घाई गडबड करून चालणार नाही कोणाला आपण बोलल्याने त्रास होणार नाही याकडे विशेष लक्ष देणे महत्वाचे ठरेल.

कर्क (Cancer Horoscope):

कर्क राशी जातकांना हा सप्ताह कामाचा उरक चांगल्या पद्धतीने पार पडेल वरिष्ठांमार्फत कौतुकाची थाप पाठीवर पडेल आश्वासन देऊन बसू नये ,प्रवास घडून येतील.

सिंह (Leo Horoscope):

सिंह राशी जातकांना हा सप्ताह प्रवास घडवून आणणारा ठरेल निवडक लोकांच्या सहवासात राहणे होईल, आर्थिक समस्या उद्भवतील ,सुरवातीच्या काळात मनाची अस्वस्थता होईल परंतु सप्ताह च्या शेवटच्या टप्यात नक्की मार्ग सापडेल.

कन्या (Virgo Horoscope):

कन्या राशी जातकांना हा सप्ताह नोकरीत बदल घडवून आणेल मनाविरुद्ध घटना घडतील ,कामाचा त्रास करून न घेता व्यवस्थित अनुभवी व्यक्तिचे सल्ले ऐकणे फायदा करून जातील कौटुंबिक समस्या निर्माण होतील चिडचिड होणे टाळावे.

तुळ (Libra Horoscope):

तुळ राशी जातकांना हा सप्ताह आत्मविश्वास बळकट होईल , जोडीदारा मध्ये आनंदी वातावरण निर्माण होईल, विचारात जास्त रमून राहणे होईल कामावर लक्ष्य दुर्लक्षित ,तोटा संभवतो. कामावर नियंत्रण ठेवावे.

वृश्चिक (Scorpio Horoscope):

वृश्चिक राशी जातकांना हा सप्ताह आरोग्य समस्या निर्माण करेल ,उष्णतेचे त्रासा शी सामना करावा लागेल, कौटुंबिक विचारात मतभेद निर्माण होतील प्रवास घडून येतील कौटुंबिक विरह घडेल.

धनु (Sagittarius Horoscope):

धनु राशी जातकांना ह्या सप्ताहात नवनविन कल्पना सुचतील आर्थिक उन्नती करणारा सप्ताह ठरेल, मित्र परिवारांची मदत मिळेल वरिष्ठ अधिकार्यांमार्फत नवीन प्रश्न समोर उभे राहातील ,मित्र परीवारा मार्फत योग्य मार्गदर्शन मिळेल , सप्ताह शेवटी उत्साह निर्माण होईल.

मकर (Capricorn Horoscope):

मकर राशी जातकांना हा सप्ताह ठराविक बदक घडून आणणारा हा आठवडा राहील ,नियोजीत केलेले काम ऐनवेळी गडबड करेल, नवीन निर्णय घेणे चुकीचे ठरेल शक्यतो व्यवसाय /इत्यादी कार्य सुरू करण्यासाठी हा सप्ताह टाळावा.

कुंभ (Aquarius Horoscope):

कुंभ राशी जातकाना सप्ताह विचाराची अवस्था संभ्रमात टाकेल , शांतता राखणे योग्य राहील नोकरी क्षेत्रात कामाचा कंटाळा वाटेल, बदल करावा असे वाटेल परंतु बदल न करणे योग्य राहील.

मीन (Pisces Horoscope):

मीन राशी जातकांना हा सप्ताह माणसे तुटणार नाही काळजी घ्यावी , गैरसमज निर्माण होतील, सुरवातीचा काळ उत्तम जाईल शेवटी अनेक प्रकारचे बदल घडून आणेल ,ईच्छा नसताना लांबचे प्रवास घडून येतील.

बीड, महाराष्ट्र मोबाईल: 98 50 610 215

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद