Horoscope राशीभविष्य  Team Lokshahi
राशी-भविष्य

Horoscope राशीभविष्य| 'या' राशींनी ठेवावं रागावर नियंत्रण अन्यथा...

आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील, कोणत्या स्थितीत तुम्हाला लाभ आणि सुख मिळेल, वाचा आजचे तुमचे राशी भविष्य.

Published by : Team Lokshahi

मेष (Aries Horoscope)

आजचा दिवस मुलांच्या चिंतेत आणि त्यांच्या कामात जाईल. नातेवाईकांशी पैशाचे व्यवहार करताना काळजी घ्या. धार्मिक क्षेत्राच्या प्रवासावर खर्च होऊ शकतो. प्रवासात काळजी घ्या. मानसिक ताण तणावापासून दूर राहावे. पत्नीला कामात सहकार्य करावे.

वृषभ (Taurus Horoscope)

आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होणार आहे. कौटुंबिक कार्यात सहभागी व्हाल. अभ्यासूपणे काम करावे लागेल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. नवीन योजनांची अंमलबजावणी करावी. हा दिवस धावपळीचा असणार आहे. आरोग्याची काळजी घ्या.

मिथुन (Gemini Horoscope)

अचानक प्रवासाचा योग जुळेल . सावध रहा आणि भांडणे टाळा. हातातील कामात यश येईल. ठरवलेली कामे समाधानकारक करा. घरातील जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडाल. दिवसाची सुरुवात अनुकूल होईल.

कर्क (Cancer Horoscope)

रागावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत वाद निर्माण होऊ शकतो. मन आनंदी राहील. दिवस आनंदात आणि उत्साहात जाईल. कामात यश मिळेल. हा दिवस धावपळीचा असणार आहे. आरोग्याची काळजी घ्या.

सिंह (Leo Horoscope)

कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत यश मिळेल. व्यवसाय किंवा नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. अधिक पैसे खर्च होऊ शकतात. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. काम पूर्ण झाल्यामुळे तुमचे मनही प्रसन्न राहील.

कन्या (Virgo Horoscope)

आज तुमचे विरोधकही तुमची प्रशंसा करतील. सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. व्यवहारी दृष्टीकोन बाळगावा लागेल. कौटुंबिक कार्यात सहभागी व्हाल.

तुळ (Libra Horoscope)

आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. मनातील प्रेमभावनेत वाढ होईल. हाती घेतलेले आवडते काम पूर्ण होईल. जोडीदाराशी ताळमेळ जुळवावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहील.

वृश्चिक (Scorpio Horoscope)

आजूबाजूला आनंददायी वातावरण असेल. कोणतेही मोठ्या व्यवहाराची समस्या सुटू शकते. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. जुन्या मित्रपरिवाराची भेट होईल. जोडीदारासोबतचे जुने मतभेद मिटतील. आर्थिक बाबतीत लाभ होईल.

धनु (Sagittarius Horoscope)

नोकरी-व्यवसायाच्या क्षेत्रात यश मिळेल. आजचा दिवस आनंददायी असेल. चांगला खर्च आणि कीर्ती वाढेल. कौटुंबिक वातावरणात चांगला असेल. देणी-घेणी मिटतील. आर्थिक बाबतीत लाभ होईल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

मकर (Capricorn Horoscope)

अनेक जबाबदारीमध्ये वाढ होईल. प्रवास आनंददायी व लाभदायक राहील. मित्र आणि नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अधिकार्‍यांशी संबंध बिघडू देऊ नका. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

कुंभ (Aquarius Horoscope)

बोलण्यात नम्रता ठेवा. विद्यार्थांना शिक्षण आणि स्पर्धेत विशेष यश मिळेल. डोके शांत ठेवा. कामात लक्ष घालावे. नवीन गोष्टी आत्मसात कराल. योग्य संधीचा लाभ घ्यावा. व्यापार्‍यांना काही चांगले लाभ होतील.

मीन (Pisces Horoscope)

मुलांच्या शिक्षणात किंवा कोणत्याही स्पर्धेत अवेळी यश मिळेल. कोणतेही रखडलेले काम पूर्ण होईल. चुकीच्या गोष्टींची चर्चा टाळावी. बोलताना संयम राखावा. रागावर नियंत्रण ठेवा. खर्चाला आळा घालावा.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक

Ganeshotsav 2025 Toll-Free Passes: बाप्पाचा आर्शिवाद! कोकण प्रवासासाठी विशेष पास कसा मिळवायचा? जाणून घ्या...

Gold Rate Today : देशभरात सोने-चांदीच्या किमतींतील घसरणीला ब्रेक; तुमच्या शहरातील दर जाणून घ्या