Vidhansabha Election

Digital Voting Card: मतदान कार्ड हरवलं? डिजिटल कॉपी कशी मिळवावी जाणून घ्या

तुमचं मतदान ओळखपत्र जर हरवलं असेल तर घाबरून जाण्याचं कारण नाहीये. कारण तुम्ही पुढील स्टेप्स फॉलो करून तुमचं मतदान ओळखपत्र डाऊनलोड करु शकणार आहात.

Published by : Team Lokshahi

राज्यभरात येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान पार पडणार आहे. यावेळी तुमचं मतदान ओळखपत्र जर हरवलं असेल तर घाबरून जाण्याचं कारण नाहीये. कारण तुम्ही पुढील स्टेप्स फॉलो करून तुमचं मतदान ओळखपत्र डाऊनलोड करु शकणार आहात.

तुम्हाला तुमचं मतदान कार्ड डाऊनलोड करण्यासाठी voterportal.eci.gov.in वर जायचं आहे. या वेबासाइटवर गेल्यानंतर तुम्हाला EPIC नंबर किंवा फॉर्म रेफरन्स नंबर द्यावा लागेल. हा नंबर दिल्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. आलेला ओटीपी तुम्हाला सबमिट करायचा आहे. हा ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला पुढे E-Epic Download असा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा आणि आता तुम्ही तुमचे डिजिटल मतदान कार्ड/ओळखपत्र पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करु शकता.

आता तुम्हाला जर डुप्लिकेट मतदान कार्ड/ओळखपत्र डाऊनलोड करायचं असेल तर तुम्हाला https://www. nvsp.in/ या लिंकवर जाऊन एक फॉर्म डाऊनलोड करावा लागेल. यानंतर तिथे नमुद केलेले सगळे डॉक्युमेंट सबमिट/अपलोड करा. सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं मतदान कार्ड/ओळखपत्र हरवल्यावर तुम्हाला पोलिसात तक्रार करावी लागणार आहे. यानंतर इतर कागदपत्र आणि फॉर्म स्थानिक निवडणूक अधिकाऱ्याकडे जमा करावी लागतील.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच

Nashik Building Collapsed : नाशिकमध्ये इमारत कोसळली, सहा ते सातजण जखमी

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द