रिअल इस्टेट क्षेत्रातील मोठे नाव असलेल्या हिरानंदानी समुहावर (Hiranandani Groups) आज आयकर विभागाने (I-T department)धाड टाकली आहे. मंगळवारी सकाळीच आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकाच वेळी देशभरातील २४ जागांवर छापेमारी केली.
हिरानंदानी समुहाच्या देशभरातील २४ जागांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. यात मुंबई, चेन्नई, बेंगळुरू येथील कार्यालयांचा समावेश आहे. आयकर विभागाचे एक पथक कार्यालयात व अधिकाऱ्यांच्या घरी कागदपत्राची तपासणी करत आहे. आज सकाळपासून आयकर विभागाचे अधिकारी हिरानंदानी समुहाच्या कार्यालयात ठाण मांडून बसले आहेत. दरम्यान हिरानंदानी ग्रुपच्या समूहाच्या प्रवक्तांनी यासंदर्भात माध्यमांकडे कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.