Marathwada

आयकर, इन्कम टॅक्सच्या धाडी टाकेन…, भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल

Published by : left

राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी नेहमीच भाजपवर आयकर, इन्कम टॅक्सचा गैरवापर करून नेत्यांवर कारवाई करत असल्याचा आरोप करत असते. आता तर थेट ऑडिओ क्लिप (Audio Clip) लोकशाही न्यूजच्या हाती लागली आहे. ज्यामध्ये भाजप आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) आयकर, इन्कम टॅक्सच्या धाडी टाकेन अशी धमकी देत आहे. या संदर्भातली ऑडिओ क्लिप (Audio Clip) आता व्हायरल होत आहे.

औरंगाबादमध्ये बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांचा बंगला आहे. या बंगल्याचे साडेतीन लाख रुपयांचे लाईट बिल पेंडिंग असल्याने महावितरण अधिकाऱ्याने मीटर कापला होता. या संदर्भात कुठलीही नोटीस न बजावल्याने बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) आक्रमक होत त्यांनी थेट अभियंत्याला फोन करून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून धमकी दिली आहे.

ऑडिओ क्लिपमध्ये (Audio Clip) बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) म्हणतायत, झोपडपटटीत आकडा टाकतात तिथे जा, आम्ही पैसे भरतो. चोरांना पकडत नाही आणि बिल भरणाऱ्याला त्रास देतात असेही लोणीकर (Babanrao Lonikar) अभियंत्याला दम देतायत.तसेच ऊर्जा मंत्री माझे जवळचे नातेवाईक आहेत त्यांना सांगून तुम्हाला निलंबित करेल. आयकर, इन्कम टॅक्सच्या धाडी टाकेन. तुमची प्रॉपर्टीची कुंडली काढणार असा दम देखील लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी दिला आहे.

आमचे मीटर नोटीस न देता काढून नेता तूम्ही, नोटीस द्या कायदेशीर असे म्हणत, 30 वर्ष आमदार आहे, मी मंत्री राहीलो, आमच्या नांदी लागू नका असाही इशारा लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी ऑडिओ क्लिपमध्ये अभियंत्याला दिला आहे. या संदर्भातील ऑडिओ क्लिप आता व्हायरल होत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात चिमुकलीने जिंकली मनं ! राज ठाकरेंना म्हणाली 'I love You तर...

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुखद ! काका-पुतण्याच्या गळाभेटीने महाराष्ट्र सुखावला, आता पुढे काय होणार ? याकडे सगळ्यांचेच लागले लक्ष

Sushil Kedia Apologizes : मराठीबद्दल वादग्रस्त विधानानंतर अखेर सुशील केडियाने मागितली माफी