पॅरालिम्पिक 2024

"भारतीय हॉकी संघ पुढील ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकू शकतो" माजी गोलकीपर पीआर श्रीजेश म्हणाला...

टोकियो आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर भारतीय हॉकी संघ 2028 मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकू शकतो, असा विश्वास भारताचा महान गोलरक्षक पीआर श्रीजेश याने व्यक्त केला आहे.

Published by : Dhanshree Shintre

टोकियो आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर भारतीय हॉकी संघ 2028 मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकू शकतो, असा विश्वास भारताचा महान गोलरक्षक पीआर श्रीजेश याने व्यक्त केला आहे. पॅरिस ऑलिम्पिकनंतर क्रीडाक्षेत्राला अलविदा करणाऱ्या श्रीजेशने येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, 'आमच्याकडे अतिशय प्रतिभावान संघ आहे. माझ्या जागी आलेला कृष्ण पाठक हा उत्कृष्ट गोलरक्षक आहे. हा संघ लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकू शकतो.

श्रीजेश म्हणाला, 'मी बिहारमध्ये सकारात्मक बदल पाहिले आहेत, विशेषतः राजगीरमधील क्रीडा संकुलात. तेथे आता ॲस्ट्रो टर्फ बसवण्यात आले असून महिला आशियाई कप ट्रॉफीही या वर्षाच्या अखेरीस खेळवली जाणार आहे. ते म्हणाले, 'बिहार हे देशातील क्रीडा क्षेत्राचे पुढील केंद्र बनू शकते. मी येथील क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोललो असून अनेक नवीन उपक्रम येथे सुरू होत आहेत.

भारतीय ज्युनियर संघाचा प्रशिक्षक बनलेल्या श्रीजेशने सांगितले की, त्याचे डोळे पुढील आशिया चषकावर आहेत आणि तो माजी क्रिकेट कर्णधार आणि प्रशिक्षक राहुल द्रविडकडून प्रेरणा घेतो. भारतीय क्रिकेटची भिंत म्हटल्या जाणाऱ्या द्रविडने प्रशिक्षक म्हणून भारतीय क्रिकेटमध्ये कौतुकास्पद योगदान दिले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Wadala Vitthal Mandir : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विठुरायाच्या चरणी नतमस्तक; प्रति पंढरपुरात पांडुरंगाची केली महापूजा

Latest Marathi News Update live : कोकण किनारपट्टीला आज ऑरेंज अलर्ट, ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

Ashadi Ekadashi 2025 : शेतकरी, कष्टकरी, सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना

आजचा सुविचार