ऑलिम्पिक 2024

Paris Olympic Hockey 2024: चक दे इंडिया! भारतीय पुरुष हॉकी संघाने आयर्लंडचा केला 2-0 ने पराभव

भारतीय पुरुष हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील पूल ब सामन्यात आयर्लंडचा 2-0 असा पराभव केला.

Published by : Dhanshree Shintre

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघानं पुन्हा एकदा भारताचा तिरंगा फडकवला आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील पूल ब सामन्यात आयर्लंडचा 2-0 असा पराभव केला. भारताने अशा प्रकारे पॅरिस गेम्समध्ये आपली अपराजित मोहीम सुरू ठेवली आहे.

भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंगने दोन गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली जी शेवटपर्यंत अबाधित राहिली. हरमनप्रीतने 11व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकवर पहिला गोल केला. त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये त्याने 19व्या मिनिटाला मैदानी गोल करत संघाची आघाडी दुप्पट केली. भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग विजयाचा हिरो ठरला.

भारताचा पहिला गोल 11व्या मिनिटाला हरमनप्रीतनं पेनल्टी स्ट्रोकद्वारे केला. यानंतर भारतीय कर्णधाराने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करत आठ मिनिटांनी पेनल्टी कॉर्नरवर संघासाठी दुसरा गोल केला. हरमनप्रीत या ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक गोल करणारा हरमनप्रीत खेळाडू ठरला आहे. त्यानं ऑलिम्पिकमध्ये 4 गोल केले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 : 'या'भारतीय माजी खेळाडूला मिळाली मोठी जबाबदारी; समितीत निवड

Aditi Sunil Tatkare : हेमंत ढोमेचा 'क्रांतिज्योती विद्यालय' चित्रपट लवकरच; आदिती तटकरे यांच्या हस्ते नारळ फोडला

Anil Ambani : अनिल अंबानींच्या संबंधित सहा ठिकाणांवर सीबीआयचे छापे

Rohit Pawar : 'मानहानीची एवढी काळजी होती तर...'; मानहानीच्या नोटीसीवर रोहित पवारांची प्रतिक्रिया