Mumbai

आयआयटी मुंबईमध्ये भारतातील पहिलं कार्बन कॅप्चर आणि युटिलायझेशनचं राष्ट्रीय केंद्र

Published by : Lokshahi News

आयआयटी मुंबईमध्ये भारतातील पहिलं कार्बन कॅप्चर आणि युटिलायझेशनचं राष्ट्रीय केंद्र स्थापन होणार आहे. या केंद्राला डिसेंबर 2021 मध्ये औपचारिकपणे मंजुरी देण्यात आली आहे.

केंद्र भारत सरकारद्वारे अनुदानित देशातील पहिलं, असं केंद्र असून यात औद्योगिक आणि ऊर्जा क्षेत्रातून उत्सर्जित होणारे CO2 कमी करण्याच्या धोरणांचा समावेश असेल.  यासोबतच जागतिक हवामानातील कार्बनडाय ऑक्सईड (CO2) ची भूमिका समजून घेणे.

CO2 कॅप्चर, वाहतूक,वर्धित पेट्रोलियम पुनर्प्राप्तीमध्ये वापर आणि बायोमासमध्ये रूपांतरण हे कार्य केंद्राच्या प्रमुख उपक्रमांपैकी असतील. कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन अ‍ॅण्ड स्टोरेज (CCUS) हा हवामानातील बदल कमी करण्यासाठी एक महत्वाचे असणार आहे.

केंद्र कार्बन कॅप्चर आणि युटिलायझेशन वापराच्या क्षेत्रात एक मल्टी-डीसीप्लिनरी, दीर्घकालीन संशोधन, विकास, सहयोग व निर्मिती केंद्र म्हणून काम करेल. NCoE द्वारे क्रॉस-डिसिप्लिनरी प्रशिक्षण पुढील पिढीच्या संशोधकांमध्ये  समस्या-केंद्रित दृष्टीकोन विकसित करेल. नॅशनल सेंटर डोमेनमधील सध्याच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट सोबत नावीन्यपूर्ण कार्याचा कॅप्चरिंग आणि मॅपिंग करणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा