आयपीएलचे सामाने रद्द झाल्याने क्रिकेटप्रेमींचा हिरमोड झाला होता. पण आता क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. आयपीएल २०२१च्या उर्वरित सामने यूएईत होणार आहेत. सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यात हे सामने खेळवण्यात येतील. अशी घोषणा बीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी केली.
आज बीसीसीआयची विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यात सदस्यांनी आयपीएल पुन्हा सुरू करण्यास एकमताने सहमती दर्शवली. त्यानंतर युईएत सामने खेळवण्यावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले.