आज IPL च्या 15 व्या हंगामातील मुंबईचा पहिला सामना सुरू आहे. दिल्लीच्या संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आधी मुंबईचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला.
फलंदाजी करताना कप्तान रोहीत शर्मा 41 धावांवर बाद झाला. त्यावेळी संघाची अवस्था 1 बाद 66 अशी होती. त्यानंतर रोहीतसोबत सलामीला आलेल्या किशनने मुंबईसाठी डाव सांभाळला. इतर कोणालाही विशेष कामगिरी करता आली नाही.
किशनची कामगिरी:
11 चौकार व 2 षटकारांसह इशन किशनने 48 चेंडूत 81 धावा ठोकल्या. त्यामूळे यंदाच्या ऑक्शनमध्ये सर्वाधिक (15.25 Crore) बोली लावून मुंबईच्या संघाने त्याला विकत घेतल्याचा निर्णय योग्य असल्याचं त्याने सिद्ध केलंय.