अमरावती शहरातील राजापेठ येथील उड्डाणपुलावर तसेच दर्यापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात आला होता. मात्र हे दोन्ही पुतळे विनापरवाना असल्याने ते हटवण्यात आले होते यावर राणा दाम्पत्य आक्रमक झाल्यानं अमरावतीचं राजकारणात चांगलेच तापलं होत.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मराठी मध्ये बोलत लोकसभा सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा विषय मांडला यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांना महाराष्ट्राचे दैवत मानल जातं मात्र पुतळ्याला परवानगी देत नाही. आम्हाला नजरकैदेत ठेवलं जातं असा सवाल नवनीत राणा यांनी लोकसभेत उपस्थित केला.