Lokshahi News, lokshahi latest news, mumbai, Maharashtra, lokshahi breaking news, lokshahi marathi news, maharashtra news, breaking news, big breaking, Mumbai Mayor Kishori Pedanker suddenly entered Yashwant Jadhav's house.  
Mumbai

यशवंत जाधवांच्या घरावर IT ची धाड; महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या…

Published by : Shweta Chavan-Zagade

शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) आणि माझगावमधील शिवसेना संघटक विजय लिपारे (Vijay Lipare) यांच्या घरावर आयकर विभागाने (IT) छापा टाकल्याने मुंबईतील वातावरण तापले आहे. आज (25 फेब्रुवारी ) सकाळपासून आयकर विभागाचे अधिकारी यशवंत जाधव आणि विजय लिपारे यांच्या घरी ठाण मांडून बसले आहेत. आयकर विभागाचा तपास सुरु असतानाच अचानक मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर (Kishori Pednekar) यशवंत जाधव यांच्या घराबाहेर दाखल झाल्या. त्यावेळी किशोरी पेडणेकर यांनी Yashwant Jadhav यांच्या घराबाहेरच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

"प्राप्तिकर विभागाची धाड पहिल्यांदा पडत आहे अशातला भाग नाही. या सगळ्या संस्थ्या संविधानाला मानून काम करत आहेत. त्यांना जी माहिती हवी आहे ती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव हे नक्की देतील. शिवसैनिकांनी (shivsena) अनुचित प्रकार करू नये म्हणून मी या ठिकाणी आले आहे. यशवंत जाधव या धाडीला हवी ती उत्तरे देतील," असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

"आज तुम्ही ज्या पद्धतीने यंत्रणांचा वापर करत आहात ते मुंबई आणि महाराष्ट्र बघत आहे. जिथे भाजापाची सत्ता नाही तिथे हा त्रास होत आहे. हा त्रास होत आहे म्हणून आम्ही घरात घाबरुन बसणार नाही. जे आहे ते तुम्हाला दाखवू. हे सर्व दुधाने धुतलेले आहेत आणि शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एवढेच बरबटलेले आहेत हे त्यांचे म्हणणे आहे. आम्ही कायदा मानतो आणि त्यानुसार ही पाहणी आहे. यशवंत जाधव याला उत्तर देतील. त्यामुळे उगाचच वातावरण बिघडू नका," असे महापौर म्हणाला.

"सगळं स्पष्ट होऊन आपल्या समोर येणार आहे. त्याआधीच लंकेला आग लावावी तसे हे सगळ बोंबलत चालले आहेत. या यंत्रणा दोन्ही बाजूने वापरता येतात. निवडणुकीच्या तोंडावर आणि सत्ता गेल्यापासून बुडाला आग लागली आहे हे महाराष्ट्र आणि मुंबई बघत आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी कुठलाही अनुचित प्रकार करु नका. आधी शिवसैनिक असलेल्या छगन भुजबळांनाही चिवटपणे लढा दिला. त्यांना दोन वर्षे मनस्ताप भोगावा लागला. पण नंतर त्याच कोर्टाने त्यांना क्लीन चीट दिली," असेही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

भाजपला केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून जे काही करायचे आहे, ते करु द्या. आम्ही पाहिजे ती माहिती तुम्हाला देऊ. हा त्रास फक्त महाराष्ट्रातील नेत्यांनाच होत नाही. देशात ज्याठिकाणी भाजपची सत्ता नाही, तिथे सगळ्यांना अशाप्रकारे त्रास दिला जातो. त्यामुळे आम्ही २०२४ पर्यंत हा मनस्ताप सहन करू. पण भाजपने केंद्रीय यंत्रणा या दुधारी तलवार आहेत, हे ध्यानात ठेवावं. या यंत्रणांचा दोन्ही बाजूंनी वापर करता येतो, अशा इशारा किशोरी पेडणेकर यांनी दिला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live :19 वर्षानंतर राज-उद्धव ठाकरे एकत्र

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्यावर मराठी कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया

Raj Thackeray - Uddhav Thackeray : मेळाव्यासाठी अभूतपूर्व गर्दी, पूर्ण क्षमतेने भरला वरळी डोम; राज - उद्धव यांना ऐकण्यास कार्यकर्ते उत्सुक

Chandu Mama on Raj- Uddhav Thackeray : उद्धव-राज ठाकरे एकत्र! चंदू मामा वैद्य यांच्या प्रयत्नांना यश