India

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश; चकमकीत जैशचे 4 आणि लष्करच्या एका दहशतवाद्याचा खात्मा

Published by : Lokshahi News

जम्मू-कश्मीरमध्ये पुलवामा- बडगामध्ये सुरक्षा दलांला मोठे यश मिळाले आहे. चकमकीत जैशचे 4 आणि लष्करच्या एका दहशतवाद्याचा खात्मा सुरक्षा दलाने केला. तसेच बडगाममधील दहशतवाद्यांकडून शस्त्रे जप्त केली. ठार झालेल्या दहशतवाद्यांमधील चार जण हे जैश-ए-मोहम्मद आणि एक जण लष्कर-ए-तैयबाचा आहे.

https://youtu.be/oP3K3ZGoWy4

पुलवामाच्या नायरा गावामधील चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले. तर, बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये दुसरी चकमक सुरू झाली. आणि बडगामच्या चरार-ए-शरीफ भागात सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत एका दहशतवादीला ठार करण्यात यश मिळाले.

काश्मीर झोन पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चरार-ए-शरीफ भागात शोध मोहिम सुरू झाली. परंतु या शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी केलेल्या प्रत्युत्तरानंतर लष्कर-ए-तैयबाचा एक दहशतवादी ठार झाला .तसेच ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून एक AK-56 रायफल जप्त केली आहे. चरार-ए-शरीफ भागात शोध मोहिम सुरू आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा