जम्मू-काश्मीरच्या सोपोर येथे दहशतवादी हल्ल्याची माहिती समोर आली आहे. सोपोर जिल्ह्याच्या आरामपोरा नाक्यावर दहशतवाद्यांनी सीआरपीएफ आणि पोलिसांच्या संयुक्त तुकडीवर हल्ला केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी शहीद झाले असून तीन स्थानिक नागरिकदेखील मृत्युमुखी पडले आहेत. तर दोन पोलीस कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले आहेत. काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी या हल्ल्यामागे लष्कर-ए-तैयबाचा हात असल्याचं म्हटलं आहे.
दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सीआरपीएफमधून मोठी मोहिम हाती घेण्यात आली असून संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. तर मोठ्या प्रमाणात झाडाझडती सुरू करण्यात आली आहे. याआधी जम्मू-कश्मीरच्या शोपिंया जिल्ह्यात शुक्रवारी देखील दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला होता.