काल 5 राज्यांतील निवडणूकांचे निकाल लागले. केवळ पंजाब वगळता इतर चारही राज्यांत भाजपने मुसंडी मारलेली पाहायला मिळतेय. ह्यानंतर भाजपच्या सर्व नेते व कार्यकर्त्यांकडून हा विजय मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. तर, विविध पक्षातील विविध नेत्यांकडून संमिश्र अशी प्रतिक्रीया समोर येत आहेत. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व सर्वेसर्वा शरद पावार ह्यांची प्रतिक्रीया आल्यानंतर आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ह्यांची प्रतिक्रीया आली आहे.
ह्या निकालांविषयी बोलताना जयंत पाटील म्हणाले, 'ज्यांच्यावर आरोप झाले ते भाजपमध्ये गेले त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली गेली नाही.' ह्याशिवाय बोलताना ते म्हणाले, 'उत्तर प्रदेश मध्ये विरोधी पक्ष एकवटले असते तर आज हे चित्र दिसून आलं नसतं.'
ह्या निकालांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होईल का?
'उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र मध्ये बरंच अंतर आहे' असं मत पाटलांनी व्यक्त केलंय. तर, 'एखाद मोठं राज्य त्यांच्याकडे आलं तर लगेच दुसरे पक्ष फुटतील असं काही नाही' असंही ते म्हणाले.
मुंबई महानगर पालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार?
यंदाच्या वर्षी मुंबई महानगर पालिकेची निवडणूक असल्याने कालचा 5 राज्यांतील निवडणूकांचा निकाल महानगर पालिकेच्या दृष्टीने फार महत्ताचा मानला जातोय. मात्र, 'मुंबई महापालिकामध्ये शिवसेनेचीच सत्त्ता येणार.' असा विश्वास जयंत पाटलांनी व्यक्त केलाय.