अध्यात्म-भविष्य

Jyeshtha Gauri Pujan 2023: गौरी पूजनचा शुभ मुहूर्त, पद्धती आणि प्रथा; जाणून घ्या

ज्येष्ठा गौरींची स्थापना करण्यात आली आहे. दुसर्‍या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींचे महापूजन होतं.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Jyeshtha Gauri Pujan 2023 : राज्यभरात गणपतींचे मोठ्या थाटामाटात आगमन झाले आहे. यानंतर आता ज्येष्ठा गौरींची स्थापना करण्यात आली आहे. दुसर्‍या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींचे महापूजन होतं. अखंड सौभाग्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी ज्येष्ठा गौरी उत्सव साजरा केला जातो. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात पहिल्या दिवशी गौरींचे आगमन, दुसऱ्या दिवशी पूजन आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते.

ज्येष्ठा गौरी पूजा शुभ मुहूर्त 2023

ज्येष्ठा गौरी पूजन तारीख - 22 सप्टेंबर 2023

ज्येष्ठा गौरी पूजन पध्दती

सकाळी गौरींची/महालक्ष्मीची पूजा-आरती करून केलेल्या फराळाचा (बेसनलाडू, करंजी, रव्याचा लाडू, गुळपापडीचा लाडू, चकली, शेव ) नैवेद्य दाखवतात. नंतर संध्याकाळी आरती करतात. पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, आंबाडीची भाजी, सोळा भाज्यांची एकत्र भाजी वगैरे पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो. सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवून नैवेद्य दाखवला जातो. गोड नैवेद्य म्हणजे घाटावर पुरणपोळी, कोकणात घावन-घाटले, खीर तर काही ठिकाणी चक्क तिखट नैवेद्य दाखवला जातो. गौरी पूजनादरम्यान माता गौरीचा जप करावा आणि कथा सर्वांना सांगावी आणि त्यानंतर गणपती आणि गौरीची आरती करावी. आरतीनंतर नैवेद्याचा प्रसाद सगळ्यांना वाटावा.

राज्यभरात गौरी पूजनाची पध्दत वेगवेगळी आहे. कोकणातील काही भागांमध्ये नववधूंसाठी गौरीपूजनामध्ये ‘ओवसा’ ही एक महत्त्वाची परंपरा दिसून येते. ही प्रथा दरवर्षी होत नसून ज्या वर्षी पूर्वा नक्षत्रावर गौरीचे पूजन होते त्याच वर्षी ही सुपे ओवसली जातात. नवीन लग्न झाले की, नववधूकडील मंडळी या ओवशाची वाट पाहतात. नव्या सुपात चोळ, खण, विडा, पूजा द्रव्ये, पाच प्रकारची फळे, पाच प्रकारचे घरात केले जाणारे सणाचे पदार्थ-मोदक, करंजा, लाडू वगैरे सुपातील पानावर मांडून नवी साडी नेसून नववधू ते सू डोक्यावर घेऊन गौरीचे पूजन झाले की ते सूप गौरीसमोर धरून वरून खाली अशाप्रकारे पाच वेळा करते याला सूप ओवसणे (ओवाळणे) म्हणतात. त्यानंतर नववधू सुपातील पाने ज्येष्टांना देऊन नमस्कार केला जातो. घरातील मोठी माणसे आशीर्वाद म्हणून काही रक्कम सुपात ठेवतात.

तर, काही ठिकाणी गौरींच्या पूजेबरोबरच सुताच्या गुंड्याला सोळा गाठी देऊन त्याचीही पूजा करतात. तो गुंडा मग हळदीने रंगवून त्यातला दोरा घरातल्या सुवासिनी आपल्या गळ्याभोवती बांधतात व नवीन पीक येईपर्यंत गळ्यात ठेवतात. आश्विन वद्य अष्टमीला तो गळ्यातून काढून त्याची पूजा करतात. या दोऱ्यालाच महालक्ष्मी समजतात. महाराष्ट्रत काही ठिकाणी संध्याकाळी हळदी-कुंकूचा कार्यक्रम केला जातो. गौरी पूजनाच्या दिवशी रात्रभर गौरी जागवल्या जातात.

गौरी पूजनाचे महत्व

अविवाहीत मुलींना त्यांना हवा तसा जोडीदार प्राप्त होत असतो. घरात सुख समाधान राहण्यासाठी तसेच गौरीपूजन केल्याने विवाहित स्त्रिला अखंड सौभाग्यवती राहण्याचा आशीर्वाद मिळत असतो. गौरी पूजन केल्याने आपल्या वैवाहिक जीवनात आनंदाचे आगमन देखील होत असते. बहुतेक स्त्रिया हे व्रत संतान सुख मिळण्यासाठी करीत असतात.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Indian Woman Arrest USA : अमेरिकेत भारतीय महिलेला चोरीच्या आरोपाखाली अटक; पोलिसांच्या प्रश्नावर सोशल मीडियावर संताप

Ambadas Danve : "मी पुन्हा येईन...", विधान परिषदेतील अंबादास दानवेंचे निरोप भाषण चर्चेत

Indians Executed Abroad : 'या' देशात भारतीयांना सर्वाधिक फाशी ; निमिषा प्रिया प्रकरणानंतर आकडेवारी समोर

Israel Attack On Syria : सिरियातील लष्करी मुख्यालयावर इस्रायलचा हल्ला; तणाव वाढला