Vidhansabha Election

Kalyan Uddhav Thackrey On Ajit Pawar: अजितदादांना आशिर्वाद अखंड उपमुख्यमंत्री भव; ठाकरेंचा दादांना टोला

नाशिकमध्ये सभेसाठी भाषण करत असताना उद्धव ठाकरेंनी अजित पवारांवर टोलेबाजी केली आहे.

Published by : Team Lokshahi

नाशिकमध्ये सभेसाठी भाषण करत असताना उद्धव ठाकरेंनी अजित पवारांवर टोलेबाजी केली आहे. मविआमध्ये मुख्यमंत्री कोण होणार? ते आम्ही सगळे एकत्र बसून ठकवू ना. पण कोणत्या ही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र लूटणाऱ्यांना आम्ही मुख्यमंत्री होऊ देणार नाही ही शपथ घेऊन उतरलेलो आहोत आम्ही मैदानात. जर का प्रश्न विचारायचाच असेल देवेंद्र फडणवीसांना विचारा, एकनाथ शिंदेंना विचारा आणि अजित पवारांना विचार मला तर असं वाटत अजित पवारांना कोणी तरी आशिर्वादच दिला आहे, "अखंड उपमुख्यमंत्री भव" आपल्याकडे महिलांना आशिर्वाद देतात ना तसा यांना पण कोणी तरी आशिर्वाद दिला आहे. उपमुख्यमंत्रीपदाचा त्यांचा टिळा काही केल्या पुसला जातचं नाही.

अयोध्येमध्ये भाजपा हरण्यामागच कारण- उद्धव ठाकरे

अयोध्येमध्ये भाजपा हरण्यामागच कारण हे अयोध्येमध्ये गुजराती कॉन्ट्रॅक्टर्स आले आहेत आणि तिथे जे काही कारमधून बलिदान करण्यासाठी गेले होते ते लोढासाठी गेले होते का? असा प्रश्न देखील उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. तर पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, जिथे जाऊ तिथे खाऊ अशी यांची विचारधारा बनलेली आहे आणि त्यांची जी काही घोषणा आहे "लुटेंगे और बाटेंगे" त्याच्या विरुद्ध मी मैदानात उतरलेलो आहे आणि म्हणून मला ही निवडणूक जिंकायची आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा