कंगना रनौतच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. गीतकार जावेद अख्तरने कंगना रनौतविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. अंधेरीच्या महानगर दंडाधिकाऱ्यांनी कंगनाला न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला होता. पुढील सुनावणीसाठी कंगना गैरहजर राहिल्यास तिच्याविरोधात जामीनपत्र वॉरंट जारी केला जाईल,असा इशारा दिला आहे.
कंगनाच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले की, कंगना भारतात नसल्यामुळे मंगळवारी म्हणजेच २७ जुलैला सुनावणीसाठी ती हजर राहू शकणार नाही. त्यानंतर जावेद अख्तर यांचे वकील जय भारद्वाज या अनुपस्थितीला विरोध दर्शवला असून कोणत्याही तारखेला हजर न राहिल्याने जामीनपत्र वॉरंट देण्याची मागणी केल्यानंतर कोर्टाने कंगनाला इशारा दिला आहे.
सध्या कंगना तिच्या शूटिंगमध्ये बुडापोस्टला (हंगेरी) व्यस्त आहे. पण गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या याचिकेमुळे तिच्या अडचणी वाढण्याची शक्यता दिसून येत आहे.