Konkan

Kirit Somaiya | खेड पोलीसांनंतर दापोली पोलीस सोमय्यांना नोटीस बजावणार

Published by : left

परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या दोपोलीतील रिसॉर्टवर कारवाई करण्याच्या मुद्दयावरून भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यानुसार किरीट सोमय्या प्रतिकात्मक हातोडा घेऊन दापोलीकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे दापोलीमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अनिल परब (Anil Parab) यांचा हा रिसॉर्ट तोडण्यात यावा म्हणून सोमय्या (Kirit Somaiya) दापोलीकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, कशेडी घाट या ठिकाणी सोमय्यांना (Kirit Somaiya) पोलिसांनी अडवले आहे. सोमय्यांना दापोलीत येण्याआधीच खेड पोलिसांनी कशेडी घाटात थांबवत नोटीस देण्याचा प्रयत्न केला. खेडच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी सोमय्यांना नोटीस देण्याचा प्रयत्न केला.दरम्यान आता खेड पोलिस सोमय्यांना (Kirit Somaiya) नोटीस बजावणार आहेत. त्यामुळा आता भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या दापोली दौऱ्यामुळे शिवसेना-भाजपामधला संघर्ष आणखी वाढण्याची चिन्ह दिसत आहेत.

पोलिसांच्या नोटीशीतले कारण काय….

"ज्या अर्थी आपण मुरुड येथील साई रिसॉर्टवर कारवाई करावी याकरता दापोली येथे आंदोलन करणार आहात. आपल्या आंदोलनामुळे दापोली येथील स्थानिक लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाल्याने स्थानिकांमध्ये रोष आहे. आपणास झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यात आलेली आहे. त्या सुरक्षेस बाधा होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यासारखे कृत्य आपणाकडून होणार नाही याची खबरदारी घ्यावी. त्या अर्थी दंड प्रक्रिया संहिता कलम १४९ अन्वये आपल्यला सूचित करण्यात येते की जिल्हाधिकारी आणि जिल्हादंडाधिकारी यांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये १७ मार्च ते २२ मार्च या कालावधीत धुलीवंदन, शिवजयंती व रंगपंचमी आणि गुढीपाढवा हे सण साजरे केले जाणार असल्याने २९ मार्च पर्यंत कलम ३७(१)(३) प्रमाणे मनाई आदेश जारी केलेले असून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्यापही सुरू आहे. त्यामुळे आपण आपल्या मागणीबाबत सनदशीर मार्गाने न्याय मागून घ्यावा. कोणत्याही खाजगी जागेमध्ये अनधिकृत प्रवेश करु नये. आपणाकडून आणि आपल्या कार्यकर्त्यांकडून आंदोलनादरम्यान कोणतेही बेकायदेशीर कृत्य घडून दखलपात्र/अदाखलपत्र स्वरुपाचे कोणतेही गैरकृत्य घडल्यास त्यासाठी तुमच्यावर कारवाई केली जाईल," असे पोलिसांनी दिलेल्या नोटीसीमध्ये म्हटले आहे.

https://twitter.com/KiritSomaiya/status/1507656302759415811

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sahyadri Hospital : सह्याद्री ग्रुपचा ताबा मणिपाल कंपनीकडे; तब्बल 6 हजार 400 कोटींचा करार

Kapil Sharma : 'या' कॉमेडीयनच्या कॅनडामधील कॅफेमध्ये गोळीबार; गाडीच्या आतून गोळ्या झाडल्या अन्...

Jansuraksha Act In Maharashtra : काय आहे 'जनसुरक्षा विधेयक'; राज्यविघातक कारवायांना कसा होईल प्रतिबंध ?, जाणून घ्या सविस्तर माहिती

Udaipur File Film Controversy : 'उदयपूर फाईल्स'च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा; सर्वोच्च न्यायालयानं बंदी घालण्याच्या मागणीची याचिका फेटाळली