Pashchim Maharashtra

कोरेगाव भीमा दंगल प्रकरण; विश्वास नांगरे पाटील यांना चौकशीसाठी बोलावणार

Published by : Lokshahi News

चंद्रशेखर भांगे | कोरेगाव भीमा दंगली प्रकरणात आता मुंबईचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे. वकील ऍड आशिष सातपुते यांनी या संदर्भात आयोगासमोर अर्ज केला आहे. त्यामुळे आता विश्वास नांगरे पाटील यांची चौकशी होणार आहे.

1 जानेवारी 2018 ला विजयस्तंभ जवळ असलेल्या कोरेगाव-भीमा याठिकाणी दोन समुहात दंगल झाली होती. त्यावेळेस विश्वास नांगरे पाटील तत्कालीन कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे पोलीस महानिरीक्षक म्‍हणून कार्यरत होते.त्यामुळे मुंबईचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना चौकशीसाठी कोरेगाव-भीमा आयोग बोलवणार आहे. कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे वकील ऍड आशिष सातपुते यांनी नांगरे पाटलांना चौकशी कामी साक्ष नोंदवण्यासाठी आयोगासमोर बोलवण्यासाठी आयोगासमोर अर्ज दाखल केलाय.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Morning Tea Habits : रिकाम्या पोटी चहा पिताय ? मग 'या' गोष्टी ध्यानात घ्या अन्यथा...

EPFO Users : पीएफ खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी! तुमच्याही खात्यात व्याजाचे पैसे जमा झाले नाहीत?; जाणून घ्या उपाय

Maharashtra MSRTC In Profit : आषाढी वारीत ST महामंडळाची विक्रमी कमाई; 9.71 लाख भाविकांच्या प्रवासातून 35.87 कोटींचं उत्पन्न जमा

Gold Rate : सोने आता लाखोंच्या पार ; जाणून घ्या आजचा दर