लखीमपूरची घटना सध्या सगळीकडेच चर्चेत आहे. याप्रकरणी विरोधक केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलागा आशीश मिश्राला अटक केल्याची मागणी करत आहेत. आपल्या मुलाच्या बचावात मिश्रा यांनी दावा केला होता की गाडीवर दगड, विटांचा हल्ला झाल्याने ताबा जाऊन ही दुर्घटना घडली.
या दुर्दैवी घटनेचे काही व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असताना आता एक नवीन व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओत मिश्रा यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे गाडीवर दगड, विटांचा हल्ला होताना दिसत नाही, तर उलट चालकाकडे गाडीचा ताबा असून सुद्धा जाणूनबुजून गाडी वेगाने चालवत शेतकऱ्यांच्या अंगावर घातल्याचं दिसत आहे.
सदर व्हिडीओ मध्ये काळ्या रंगाची एसयुव्ही निशस्त्र शेतकऱ्यांच्या मागून येवून, त्यांना चिरडून पुढे गेल्याचे दिसत आहे.