India

PAN-Aadhaar कार्डसोबत लिंक करण्याचा शेवटचा दिवस; नाही तर भरावा लागेल दंड

Published by : Lokshahi News

इनकम टॅक्स विभागानं पॅन आधारला लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 म्हणजेच आज असल्याची घोषणा केली आहे. आज लिंकसाठीचा शेवटचा दिवस असून हे काम तुम्ही आजच न केल्यास तुमचं पॅन कार्ड निष्क्रीय होईल. इतकंच नाही तर आयकर कायद्यांतर्गत तुम्हाला 1000 रुपये दंडही भरावा लागेल.

लिंक न केल्यास निष्क्रीय होणार पॅन

केंद्र सरकारने वित्त विधेयक 2021 च्या अंतर्गत प्राप्तिकर अधिनियम 1961 मध्ये जोडलेला कलम 234 एच पास केला आहे. ते 23 मार्च रोजी लोकसभेत मंजूर झाले. कलम २44 एच नुसार जर आपण सरकारने दिलेल्या अंतिम तारखेपर्यंत पॅनशी आधार जोडला लिंक केलं नाही तर तुमच्याकडून 1,000 रुपये दंड आकारला जाईल. सोबतच शेवटच्या तारखेपर्यंत आपण असे न केल्यास आपलं पॅन निष्क्रिय होईल.

  1. इनकम टॅक्सच्या वेबसाईटवरुन पॅनला आधार लिंक करण्याची पद्धत –
  • सर्वात आधी इनकम टॅक्सच्या वेबसाईटवर जा
  • यानंतर आधार कार्डमध्ये दिलेलं नाव, पॅन नंबर आणि आधार नंबर लिहा
  • आधार कार्डमध्ये केवळ जन्म वर्ष मेन्शन होताच चौकटीत टीक करा
  • आता कॅप्चा कोड एन्टर करा
  • आता Link Aadhaar या बटनावर क्लिक करा
  • तुमचं पॅन आधारसोबत लिंक होऊन जाईल
  1. SMS च्या माध्यमातून लिंक करण्याची पद्धत –

यासाठी तुम्हाला तुमच्या फोनवर UIDPAN टाइप करावं लागेल. यानंतर 12 अंकी आधार नंबर लिहा आणि 10 अंकी पॅन नंबर लिहा. आता पहिल्या स्टेपमध्ये सांगितलेला मेसेज 567678 किंवा 56161 या क्रमांकावर पाठवा.

  1. पॅन निष्क्रीय झाल्यास काय करावं –

तुमचं पॅन कार्ड निष्क्रीय झाल्यास तुम्ही ते पुन्हा अॅक्टिव्ह करू शकता. यासाठी तुम्हाला एक मेसेज करावा लागेल. तुम्हाला मेसेज बॉक्समध्ये जाऊन आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरुन 12 अंकाचा PAN नंबर एन्टर केल्यानंतर स्पेस देऊन 10 अंकांचा आधार नंबर एन्टर करावा लागेल आणि 567678 किंवा 56161 या नंबरवर मेसेज करावा लागेल.

असं तपासा पॅन आधारसोबत लिंक आहे का –

  • इनकम टॅक्स विभागाची वेबसाईट www.incometaxindiaefiling.gov.in वर जा
  • यात क्विक लिंक टॅबवर आधारवर जा आणि आपलं स्टेटस तपासा
  • स्टेटस चेक करण्यासाठी आधार आणि पॅन कार्डची माहिती भरा
  • आता व्ह्यू लिंक आधार स्टेटसवर क्लिक करा
  • आता तुम्हाला समजेल की तुमचं आधार पॅन कार्डसोबत लिंक आहे का
  • SMS द्वारेही करू शकता चेक –

तुम्ही SMS च्या माध्यमातूनही पॅन आधारसोबत लिंक आहे का हे पाहून शकता. यासाठी तुम्हाला 567678 किंवा 56161 या दोन्हीपैकी एका नंबरवर SMS करावा लागेल. तुम्हाला UIDPAN 12 अंकी आधार नंबर आणि 10 अंकी पॅन नंबर लिहून एसएमएस करावा लागेल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा