लाईफ स्टाइल

Black Coffee, Green Tea आणि Herbal Tea तुमच्या शरीरासाठी काय फायद्याचे ?

चहा किंवा कॉफीचे सेवन करावे ? याबद्दल आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

Published by : Shamal Sawant

दिवसाची सुरुवात ही ताजीतवानी असावी असे प्रत्येकालाच वाटत असते. अनेकदा सकाळी उठल्यानंतर कॉफी किंवा चहाचे सेवन केले जाते. मात्र चहा किंवा कॉफी शरीरासाठी किती फायदेशीर असतो? याबद्दल अनेक समज-गैरसमज आहेत. त्यामुळे कशा प्रकारच्या चहा किंवा कॉफीचे सेवन करावे ? याबद्दल आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

चहा आणि कॉफीचे अनेक प्रकार आहेत. त्यानुसार त्या पेयांचे स्वरूप आणि फायदेदेखील बदलतात. ब्लॅक कॉफी, ग्रीन टी, हर्बल टी असे अनेक प्रकार आहेत. त्यानुसार आता आपण जाणून घेऊया.

ब्लॅक कॉफी (Black Coffee) :

अनेकांना ब्लॅक कॉफी आवडत नाही. मात्र ही शरीरासाठी योग्य प्रमाणात घेतली तर त्याचे अनेक फायदे मिळतात. दिवसाची सुरुवात ब्लॅक कॉफीने करणे हा एक उत्तम पर्याय आहे. कॉफीमुळे तुमच्यामधील एनर्जी वाढते. तसेच तुम्हाला ताजेतवानेदेखील वाटू शकते. ब्लॅक कॉफीच्या सेवनाने चयापचय चांगले होते. त्याचप्रमाणे शरीरातील चरबी जाळण्यासदेखील मदत होते.

ग्रीन टी (Green Tea):

ग्रीन टीमध्ये कॅफेन कमी प्रमाणात असते. त्याचप्रमाणे अधिक प्रमाणात अॅंटीऑक्सिडंट्सदेखील असतात. याचा तुमच्या शरीराला खूप फायदा होतो. यामुळे तुमचे शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडतात आणि रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते.

हर्बल टी (Herbal tea) :

तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात तुळस, आलं तसेच कॅमोमाइलपासून बनवलेला हर्बलचहा पिऊन पिऊनही करता येईल. हर्बल चहा हा कॅफेनमुक्त आहे तसेच यामुळे पोटाला आराम मिळतो. त्याचप्रमाणे तुम्हाला तणावमुक्त राहायचे असेल किंवा कॅफेनपासून दूर राहायचे असेल तर हर्बल टी हा उत्तम पर्याय आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा