Brain Tumor|Cancer team lokshahi
लाईफ स्टाइल

'हा' ब्रेन ट्युमर झपाट्याने वाढतोय, तरुणाई याच्या विळख्यात

ब्रेन ट्यूमरच्या प्रकरणांमध्ये पूर्वीच्या तुलनेत दुप्पट वाढ

Published by : Shubham Tate

कोरोनाच्या कालावधीनंतर ब्रेन ट्यूमरचा आलेख दुपटीने वाढला आहे. दरम्यान, सौम्य ब्रेन ट्यूमर झपाट्याने वाढत आहे आणि तरुणांनाही ग्रासत आहे. जीएसव्हीएम मेडिकल कॉलेजच्या अहवालात ही बाब समोर आली आहे. मेडिकल कॉलेजच्या न्यूरो सायन्स सेंटरने जारी केलेल्या अहवालात सर्व ब्रेन ट्यूमर कॅन्सर नसतात, असे म्हटले आहे. कर्करोग (Cancer) नसलेल्या गाठींना सौम्य ट्यूमर म्हणतात. सध्या ब्रेन ट्युमरपैकी ५५ टक्के कॅन्सर तर ४५ टक्के सौम्य असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. (brain tumor is growing rapidly youth are also in the grip)

या अहवालानुसार, कोरोनानंतरच्या काळात ब्रेन ट्यूमरच्या प्रकरणांमध्ये पूर्वीच्या तुलनेत दुप्पट वाढ झाली आहे. सौम्य ब्रेन ट्यूमर तिप्पट वेगाने वाढत आहेत. याचे कारण म्हणजे रूग्ण थोड्या त्रासाने रूग्णालयात येऊ लागले आहेत. यामुळे ट्यूमर कॅन्सर होण्यापूर्वी शोधता येतो.

गेल्या एका वर्षात, सौम्य ट्यूमरसाठी 388 ऑपरेशन्स येथे करण्यात आली, ज्यामध्ये 53 पीडित तरुण होते. या अहवालात असे म्हटले आहे की, ब्रेन ट्यूमरच्या एकूण प्रकरणांपैकी तीन टक्के रुग्ण हे तरुण होते. आता हा आकडा सात टक्क्यांवर पोहोचला आहे. जीएसव्हीएम मेडिकल कॉलेजच्या न्यूरो सायन्स विभागाचे प्रमुख डॉ. मनीष सिंग यांच्या मते, सौम्य ट्यूमरचा आलेख झपाट्याने वाढत आहे. मात्र, शस्त्रक्रिया केल्यास सौम्य ट्यूमर असलेले रुग्ण निरोगी होतात. मेडिकल कॉलेजच्या न्यूरो सायन्स सेंटरमध्ये 18 जिल्ह्यातील ब्रेन ट्युमरचे 65 रुग्ण दर महिन्याला येत असल्याने दररोज शस्त्रक्रिया केल्या जात आहेत.

एंजाइम चाचणी त्यानंतर रेडिओथेरपी

कॅन्सरच्या ट्यूमरसाठी शस्त्रक्रियेनंतर ग्लूटाथिओन सिंथेटेज एन्झाइमची चाचणी केली जात असल्याचे केंद्राच्या अहवालात म्हटले आहे. ज्या रुग्णांमध्ये हे एन्झाइम जास्त आढळून आले आहे, त्यांच्यामध्ये रेडिओथेरपीचा प्रभाव कमी असल्याचे आढळून आले आहे. या चाचणीचे परिणाम अतिशय चांगले असल्याचे आढळून आले आहे, कारण यामुळे रुग्णांची उपचार योजना निश्चित करण्यात मदत होते आणि कर्करोगानंतर त्यांना दीर्घायुष्य मिळत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

Monorail : मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार; MMRDAने घेतला महत्त्वाचा निर्णय