लाईफ स्टाइल

ताक केवळ पोटासाठीच नाही तर त्वचा आणि केसांसाठीही गुणकारी आहे, जाणून घ्या फायदे

बटर मिल्क म्हणजेच ताक हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आपण ते कोणत्याही प्रकारे सेवन करु शकतो. ताकामध्ये अनेक जीवनसत्त्वे असण्यासोबतच कार्बोहायड्रेट्स देखील आढळतात. याशिवाय, प्रथिने, पोटॅशियम, फॉस्फरस, लॅक्टिक ऍसिड आणि कॅल्शियम देखील ताकमध्ये भरपूर प्रमाणात आढळतात. लक्षात ठेवा की ताक तुमच्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे.

Published by : Siddhi Naringrekar

बटर मिल्क म्हणजेच ताक हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आपण ते कोणत्याही प्रकारे सेवन करु शकतो. ताकामध्ये अनेक जीवनसत्त्वे असण्यासोबतच कार्बोहायड्रेट्स देखील आढळतात. याशिवाय, प्रथिने, पोटॅशियम, फॉस्फरस, लॅक्टिक ऍसिड आणि कॅल्शियम देखील ताकमध्ये भरपूर प्रमाणात आढळतात. लक्षात ठेवा की ताक तुमच्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे.

पिंपल्स कमी करण्यासाठी फायदेशीर

हे लक्षात ठेवा की बटर मिल्क तुमचे पिंपल्स कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. बटर मिल्कमध्ये दह्यासारखे प्रोबायोटिक्स असते, जे आपल्या त्वचेवर बॅक्टेरियाची वाढ मर्यादित करते. चेहऱ्यावर ताक लावल्याने बंद छिद्रेही उघडतात, ज्यामुळे त्वचेच्या पेशींच्या वाढीचा वेगही वाढतो. जेव्हा त्वचा मुक्तपणे श्वास घेते, तेव्हा मुरुम देखील कमी होतात.

केसांसाठी निरोगी

केसांची वाढ वाढवण्यासाठी बटर मिल्क, बेसन आणि ऑलिव्ह ऑईल मिक्स करून मास्क तयार करा. यानंतर मास्कने टाळूची मालिश करा. साधारण अर्ध्या तासानंतर केस शॅम्पूने धुवा. असे केल्याने तुमचे केस देखील मऊ होतील आणि तुमची कोंडा दूर होईल.

चमकदार त्वचेसाठी

ताक देखील एक उत्तम मॉइश्चरायझर आहे. हे आपल्या चेहऱ्याच्या त्वचेला हायड्रेट करते. हे लक्षात ठेवा की नैसर्गिक तुरट गुणधर्मांव्यतिरिक्त, त्याची आम्लयुक्त रचना ते अधिक प्रभावी बनवते. होम मेड पेस पॅक बनवण्यासाठी बेसन आणि काकडीच्या रसात ताक मिसळून पेस्ट तयार करा. तसेच त्यात चिमूटभर हळद घाला. पेस्ट चेहऱ्यावर १५ मिनिटे ठेवल्यानंतर चेहरा धुवा.

याशिवाय उन्हात गेल्यावर जर टॅनिंग होत असेल तर ते ताकानेही काढता येते. ताक कोरफडीसोबत मिसळल्याने त्वचा हळुवारपणे मऊ होते. ही पेस्ट त्वचेला खोलवर पोषण देते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा