Healthy life
Healthy life Team Lokshahi
लाईफ स्टाइल

केळीसोबत करा दुधाचं सेवन : जाणून घ्या फायदे....

Published by : prashantpawar1

केळीसोबत दुधाचे सेवन करा याचे जबरदस्त फायदे होतील असं तुम्ही अनेकदा ऐकलं असावं. पण यासाठी तुम्हाला त्याचा योग्य वापर करावा लागेल. त्याचा योग्य वापर केल्यास केळीसोबत दुधाचे अनेक फायदे होतात. केळी आणि दुधाचं मिश्रण करून शेक बनवून त्याचे सेवन केल्यास उर्जेसोबत आरोग्यही चांगले राहते. जाणून घेऊयात केळीसोबत दुधाचे सेवन केल्यास त्यापासून आरोग्यास मिळणारे लाभ नक्की कोणते आहेत याबद्दल...

1. पचनसंस्था - केळीच्या शेकमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी-6,5,3 मुबलक प्रमाणात आढळतात. याशिवाय यामध्ये फायबरचे प्रमाणही चांगले असते. याचा पचनसंस्थेला खूप मोठा फायदा होतो. बद्धकोष्ठता आणि पोटासाठी केळीचा शेक खूप फायदेशीर ठरतो.

2.झोप- केळ्यामध्ये ट्रिप्टोफॅन आढळते जे सेरोटोनिन स्राव करण्यास मदत करते. चांगल्या झोपेत याचा खूप फायदा होतो. ज्या लोकांना कमी झोप येते ते केळीच्या शेकचे सेवन करू शकतात.

3. रोगप्रतिकारक शक्ती - केळीच्या शेकमध्ये व्हिटॅमिन सी आढळते. कोरोनाच्या काळात तुम्हाला हे जीवनसत्व नक्कीच आले असेल. होय! व्हिटॅमिन सीच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यासोबतच पांढऱ्या रक्त पेशी वाढवण्यास देखील मदत होते.

4. किडनीची समस्या- केळीच्या शेकमध्ये असे काही घटक आढळतात जे मीठाचे दुष्परिणाम दूर करतात. यामुळे किडनी आपले काम व्यवस्थित करते.

5. स्ट्रोक- केळीमध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे हृदयाशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर स्ट्रोकची शक्यता देखील कमी करते. शेक कसा बनवायचा शेक बनवण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. दोन केळी घ्या आणि त्यांचे लहान तुकडे करा. यानंतर एक कप दुधात मिसळा आणि मिक्सरमध्ये 30 सेकंद ढवळून घ्या. शेवटी त्यात दोन चमचे मध टाका. तुमचा शेक तयार आहे.

Sanjay Raut: 'नाशिकमध्ये 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा' राऊतांचा आरोप

रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी एकनाथ खडसे मैदानात

Nashik Crime: नाशिकमध्ये ICICI होम फायनान्समध्ये मोठी घरफोडी

Girgaon Linkedin Post Viral: गिरगावात जॉबसाठी आक्षेपार्ह जाहिरातीमुळे संताप; मराठी माणसालाच केली बंदी

आमदार रोहित पवार यांचा अजित पवार यांच्यावर हल्लाबोल; म्हणाले...