लाईफ स्टाइल

तुम्हीही अ‍ॅल्युमिनियम फॉइलचा अन्न पॅक करण्याकरता वापर करताय? आरोग्याला पोहोचू शकते हानी

गेल्या काही वर्षात खाद्यपदार्थ फॉइलमध्ये गुंडाळण्याची संस्कृती खूप वाढली आहे. याचे कारण असे की ज्या रोट्या कागदात गुंडाळल्यावर ओल्या होतात त्या अ‍ॅल्युमिनियम फॉइलमध्ये तशाच राहतात. पण प्रत्यक्षात अ‍ॅल्युमिनियम हा धातू आहे.

Published by : Team Lokshahi

हे अ‍ॅल्युमिनियमचे आहेत धोके

आपल्या अन्नातही काही प्रमाणात अ‍ॅल्युमिनियम असते. हे अ‍ॅल्युमिनियम फळे, भाज्या, मांस, मासे, धान्य आणि दूध आणि दहीमध्ये असते. यासोबतच चहाची पाने, मशरूम, पालक आणि मुळा यामध्येही काही प्रमाणात अ‍ॅल्युमिनियम असते. आपले शरीर हे अ‍ॅल्युमिनियम शरीरातून काढून टाकते. परंतु, जेव्हा आपण अ‍ॅल्युमिनियम फॉइल किंवा इतर कोणत्याही माध्यमातून अतिरिक्त अ‍ॅल्युमिनियम शरीरात घेतो तेव्हा त्यामुळे खूप नुकसान होते. अ‍ॅल्युमिनियममुळे आपल्या मेंदूला खूप नुकसान होते. यामुळे अल्झायमर नावाचा आजार होण्याचा धोका वाढतो असे आढळून आले आहे.आजच्या जीवनशैलीत अ‍ॅल्युमिनियम फॉइल हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे. गेल्या काही वर्षात खाद्यपदार्थ फॉइलमध्ये गुंडाळण्याची संस्कृती खूप वाढली आहे. याचे कारण असे की ज्या रोट्या कागदात गुंडाळल्यावर ओल्या होतात त्या अ‍ॅल्युमिनियम फॉइलमध्ये तशाच राहतात. पण प्रत्यक्षात अ‍ॅल्युमिनियम हा धातू आहे. आपल्या अन्नाला स्पर्श केल्यावर त्याचा दर्जा बदलतो का? अ‍ॅल्युमिनियम फॉइलमुळे जास्त अ‍ॅल्युमिनियम तुमच्या शरीरात प्रवेश करतो का? अ‍ॅल्युमिनियमचे आपल्या शरीरावर कोणते वाईट परिणाम होतात? अ‍ॅल्युमिनियम फॉइलमध्ये अन्न गुंडाळणे थांबवावे का?

अल्झायमर हा एक मेंदूचा आजार आहे ज्यामध्ये मेंदूच्या पेशी कमी होऊ लागतात आणि स्मरणशक्ती कमकुवत होते. अ‍ॅल्युमिनियम हे त्याचे प्रमुख कारण मानले जाते. अ‍ॅल्युमिनियम फॉइलचा वापर लहान मुलांसाठी खूप धोकादायक असू शकतो. जर तुम्ही खूप गरम अन्न फॉइलमध्ये पॅक केले तर उष्णतेमुळे फॉइल थोडे वितळेल. यामुळे अन्नामध्ये अ‍ॅल्युमिनियम येते जे कॅन्सरचे कारण बनू शकते. आपल्या आहारातून अ‍ॅल्युमिनियम पूर्णपणे काढून टाकणे आपल्यासाठी शक्य नाही, परंतु आपण काही प्रयत्न नक्कीच करू शकतो.

गरम अन्न अ‍ॅल्युमिनियम फॉइलमध्ये पॅक करू नका. उष्णतेमुळे, अ‍ॅल्युमिनियम वितळते आणि आपल्या अन्नात मिसळते.अनेक वेळा ओव्हनमध्ये अन्न शिजवताना ते फॉइलमध्ये पॅक केले जाते, असे करणे टाळा, कारण अशा स्थितीत आपले अन्नच शिजत नाही तर त्यासोबत फॉइलही शिजते जे हानिकारक आहे. फॉइलमध्ये फळे पॅक करणे टाळा. लिंबू, संत्री, किवी या फळांमध्ये आम्लयुक्त रस असतो. अ‍ॅल्युमिनियमसह हे आम्ल अन्न विषारी बनवू शकते. स्वयंपाकासाठी अ‍ॅल्युमिनियमची भांडी वापरणे टाळा. स्टेनलेस स्टील, लोखंडी किंवा सिरॅमिक भांडीमध्ये अन्न शिजवण्याचा प्रयत्न करा. हे तुम्हाला आणि तुमचे संपूर्ण कुटुंब निरोगी ठेवेल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis : 'विधेयक न वाचताच विरोध करणाऱ्यांचा माओवादी विचारसरणीला पाठिंबा'; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला

Bacchu Kadu : 'सरकारला डोळे असून दिसत नाही!'; म्हणत 'सातबारा कोरा यात्रे'त बच्चू कडू डोळ्याला पट्टी बांधून सहभागी

Nitin Gadkari : 'सरकारविरोधात याचिका टाकणारे लोक असायलाच हवे'; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण योजने'मुळे अन्य योजनांचा निधी वितरणात विलंब; मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वक्तव्यानं खळबळ