लाईफ स्टाइल

Mango : आंब्यासोबत 'हे' पदार्थ खाणे टाळा ; अन्यथा आरोग्यावर होईल परिणाम

चविष्ट असणारा हा आंबा योग्य पद्धतीने खाल्ल्यासच फायदेशीर ठरतो.

Published by : Shamal Sawant

उन्हाळा म्हटलं की डोळ्यांसमोर उभा राहतो तो रसाळ, गोडसर आणि सुवासिक आंबा 'फळांचा राजा'. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचंच हे लाडकं फळ आहे. मात्र, आंब्याचा स्वाद घेताना काही आरोग्यविषयक बाबी लक्षात घेणं अत्यावश्यक आहे. कारण, आंब्यासोबत काही अन्नपदार्थ खाल्ल्यास ते पोटासाठी धोकादायक ठरू शकतं, आणि त्याचे गंभीर परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतात.

चविष्ट असणारा हा आंबा योग्य पद्धतीने खाल्ल्यासच फायदेशीर ठरतो. पण काही चुकीच्या खाद्यसंयोगांमुळे पचनसंस्थेवर ताण येतो, अॅसिडिटी, गॅस, त्वचेचे त्रास आणि अॅलर्जीच्या समस्या वाढू शकतात. म्हणूनच जाणून घ्या, कोणते 5 पदार्थ आंब्यासोबत चुकूनही खाऊ नयेत:

1. दूध

दूध आणि आंबा,ऐकायला गोड वाटतं, पण हे कॉम्बिनेशन शरीरासाठी अपायकारक ठरू शकतं. हे मिश्रण पचनासाठी जड असल्यामुळे गॅस, अपचन, उलट्या आणि त्वचेवर रॅशेससारखे त्रास उद्भवू शकतात.

2. दही किंवा लस्सी

एक थंड, एक उष्ण अशा स्वभावाचे हे दोन पदार्थ एकत्र केल्यास शरीरात ‘फूड कन्फ्लिक्ट’ निर्माण होतो. परिणामी सर्दी, खोकला, अॅलर्जी आणि पचन बिघडण्याची शक्यता वाढते.

3. तळलेले पदार्थ

भजी, समोसे, फरसाण यांसारखे तळलेले पदार्थ आंब्यासोबत खाल्ल्यास शरीरातील उष्णता वाढते. यामुळे अॅसिडिटी, पिंपल्स, गॅस आणि थकवा जाणवतो.

4. मसालेदार अन्न

आंबा स्वतःच उष्ण प्रवृत्तीचं फळ आहे. त्यासोबत मसालेदार जेवण घेतल्यास पचन बिघडते, आणि त्वचेवर परिणाम होतो. यामुळे अपचन, गॅस, आणि त्वचेच्या समस्या वाढतात.

5. कोल्ड ड्रिंक्स व सोडा

थंडपेय आंब्यासोबत घेतल्यास अॅसिड रिफ्लक्स, अपचन आणि उष्णतेचे दुष्परिणाम दिसून येतात. त्यामुळे आंब्याचं सेवन हे कोल्ड ड्रिंक्सपासून वेगळं ठेवणं अधिक सुरक्षित.

‘फळांचा राजा’ म्हणून ओळखला जाणारा आंबा स्वादिष्ट तर आहेच, पण तो आरोग्यवर्धकही आहे ,फक्त योग्य पद्धतीने सेवन केला तर. या उन्हाळ्यात आंब्याचा भरपूर आस्वाद घ्या, पण वरील पदार्थांपासून अंतर ठेवा. कारण, एक चूक तुमच्या पचनसंस्थेला धक्का देऊ शकते.तुमचा आंबा आरोग्यदायी ठरावा, चविष्ट तर तो आहेच!

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा