महाराष्ट्रासह संपुर्ण भारतात उन्हाळा खुप वाढलेला आपल्याला पाहायला मिळत आहे . सकाळचे ९ वाजले कि नागरिकांच्या घामाच्या धारा वाहु लागतात. वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळेच या "हिट ला बीट"करण्यासाठी आणि तापमानाचा सामना करण्यासाठी लोकांच्या अनेक उपाययोजना'चालु आहेत काही जण शरीरात थंडावा राहावा म्हणून बर्फाचे गोळे खातात , शीतपेय पीत आहेत. तर घरी असणाऱ्या नागरिकांनी कूलर एसी यांचा पर्याय निवडला'आहे.. मात्र हा एसी आरोग्याला घातक असु शकतो.
यंदा तापमानाने स्वतःचा मागील वर्षाचा रेकॉर्ड तोडुन नवीन उच्चांक गाठला आहे. त्यामुळे नागरिक उन्हळ्यापासून बचाव व्हावा आणि शरीराला थंडावा मिळावा म्हणुन आरामदायी झोपेसाठी रात्रभर एसी चालु ठेवतात मात्र त्याचे खुप मोठे दुष्परिणाम नागरिकांना भविष्यात भोगावे लागणार आहेत . आरोग्य तज्ज्ञांनी असा इशारा दिला आहे की अत्यंत कमी तापमानात रात्रभर एसी चालु ठेवल्यामुळे झोपेची गुणवत्ता बिघडू शकते, थंड हवेमुळे अंग थरथर कापू शकते आणि अस्वस्थता येऊ शकते.
एसी चा जास्त वापर केल्यामुळे स्नायूंमध्ये ताण आणि कडकपणा येऊ शकतो. तसेच दीर्घकाळ थंड हवे मध्ये राहिल्यामुळे कोरडेपणा आणि खाज सुटणे अश्या त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात . शिवाय शरीराची रोगप्रतिकारक शक्ती थंड हवेमुळे कमी होऊन सर्दी आणि खोकला होण्याची शक्यता ही जास्त असते. एसी रात्रभर चालु ठेवल्यामुळे विजेचे बिल तर जास्त येतेच पण एसी मुळे ताज्या हवेचा अभाव निर्माण होऊन त्यामुळे सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो. तसेच थंड हवेमुळे पचनसंस्थेवर ही विपरीत परिणाम होतो. तसेच हार्मोन्स वर ही त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे उन्हाळ्यात एसी ऐवजी जर नैसर्गिक हवा किंव्हा फॅन चा वापर करणेच आपल्या आरोग्यासाठी लाभदायक आहे.