water
water  Lokshahi News
लाईफ स्टाइल

कमी पाणी पिणं पडू शकत महागात

Published by : Lokshahi News

हिवाळ्यात वातावरण थंड असल्यामुळे आपल्याला कमी प्रमाणात तहान लागते. कमी प्रमाणात तहान लागली तरीही आपल्या शरीराला पाण्याची गरज असते. त्यामुळे हिवाळ्यात आपल्या शरीरातील पाण्याच्या पातळीचा समतोल राखणं फार गरजेचं असत. नाहीतर याचे गंभीर परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात.

शरीरामध्ये रक्ताची मात्रासोबतच रक्ताचे पातळ असणे सुद्धा गरजेचे आहे, आणि पाणी रक्त पातळ करण्यास मदत करते. पाण्यामुळे मेंदूतील पेशी एकमेकांसोबत संपर्क साधण्यासाठी मदत करत असतात. सोबतच जे काही विषारी घटक असतात ते बाहेर पाडण्यासाठी सुद्धा पाणी मदत करते. आपल्या मस्तिष्कच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण करणारे जे काही विषारी द्रव्य घटक पदार्थ असतात. त्यांना बाहेर काढण्याची क्षमता पाण्यामध्ये असते आणि म्हणूनच आपला मेंदू व्यवस्थित रित्या कार्य करण्यासाठी पाण्याची नितांत आवश्यकता आहे.

शरीरात रक्त तयार करण्यासाठी तरल पदार्थांची गरज असते. जेव्हा शरीरात तरल पदार्थ कमी होतात तेव्हा रक्ताचं प्रमाणही कमी होतं. शरीरात योग्य प्रमाणात ब्लड प्रेशर कामय ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात पाण्याची गरज असते. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे हायपोटेंशन किंवा लो ब्लड प्रेशरची समस्या होऊ शकते. यामुळे व्यक्ती बेशुद्ध पडू शकतो.

जेव्हा शरीरात पाण्याची लेव्हल कमी होते तेव्हा कोशिका हायपोथॅलेमसला संकेत पाठवतात जो वॅसोप्रेसिन नावाचं हार्मोन रिलीज करतो. याला एंटीडायरेक्टिक हार्मोन असंही म्हटलं जातं. हे हार्मोन किडनीला रक्तातून कमी पाणी काढण्याचा संकेत देतो. ज्याने लघवी कमी, घट्ट आणि गर्द रंगाची येते.किडनी रक्ताचं प्रमुख फिल्टर आहे आणि योग्य प्रमाणात पाणी न पिल्याने ती शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढू शकत नाही.शरीरात पाणी झाल्याने तुम्हाला किडनी स्टोनची समस्या होऊ शकते.

पचन तंत्राला योग्य प्रमाणात पाण्याची गरज पडत असते. पाण्याच्या माध्यमातून शरीरातून न पचणारे पदार्थ बाहेर येतात आणि पचन तंत्र व्यवस्थित राहतं. शरीरात तरल पदार्थांच्या कमतरतेचा प्रभाव शौच क्रियेवरही पडतो. शरीरात पाणी कमी असेल तर याचा प्रभाव थेट आपल्या त्वचेवरही पडतो. पाण्याची कमतरता असेल तर त्वचा कोरडी पडते आणि ओठ कोरडे पडतात. अशा प्रकारचे अनेक परिणाम पाण्याच्या कमतरतेमुळे आपल्या शरीरावर होऊ शकतात. म्हणून आपल्या निरोगी आयुष्यासाठी नेहमी पाणी पीत राहिले पाहिजे.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...