Watermelon  
लाईफ स्टाइल

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यासोबत त्वचेच्या समस्यांवरही ठरते फायदेशीर; जाणून घ्‍या

Published by : Saurabh Gondhali

उन्हाळ्याच्या दिवसात कलिंगड खाल्लं की पोटात छान गार वाटतं. खरंतर या गारव्यासाठीच कलिंगड खाल्लं जातं. कलिंगडात भरपूर प्रमाणात पाणी असल्यानं उन्हाळ्या़च्या दिवसात शरीरात पाण्याचं प्रमाण योग्य राहण्यासाठी कलिंगड आहारात असणं आवश्यक आहे.

फक्त एवढ्याच फायद्यापुरती कलिंगडाचे गुणधर्म मर्यादित नाही. कलिंगडात जीवनसत्वं, खनिजं आणि ॲण्टिऑक्सिडण्टस हे महत्वाचे घटक असतात. त्यामुळे उन्हाळ्यातील त्वचेच्या समस्यांवर कलिंगड खाण्यासोबतच चेहऱ्याला लावणं हा उत्तम उपाय आहे. कलिंगडाचा वापर त्वचेसाठी केल्यास उन्हाळ्यात त्वचेवर येणारी पुरळ, त्वचेचा होणारा दाह या समस्या दूर होतात. त्वचेला थंडावा, आर्द्रता मिळते. तसेच कलिंगडातील गुणधर्मांमुळे एजिंगचा धोका टळतो.

क जीवनसत्वयुक्त कलिंगडामुळे त्वचेची खोलवर स्वच्छता होते. कलिंगडाच्या दाणेदार गराने चेहऱ्याचा मसाज केल्यास त्वचेवरची रंध्र मोकळी होतात आणि छोटीही होतात. कलिंगडातील पाण्यामुळे त्वचेतील हरवलेली आर्द्रता परत मिळवता येत. कलिंगड चेहऱ्याला लावल्यास त्वचा मऊ, मुलायम आणि तजेलदार होते. चेहरा ताजा तवाना होतो. उन्हाळ्याच्या दिवसात कूल रहाण्यासोबतच कूल दिसायचंही असेल तर कलिंगडचं फेशियल अवश्य करायला हवं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा