लाईफ स्टाइल

Fish Food : मासे आवडीने खात आहात ? पण या परिणामांबद्दलही जाणून घ्या

मासे हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात.

Published by : Shamal Sawant

सध्याच्या धावपळीच्या जगात स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. अनेक पदार्थ असे आहेत ज्यामुळे तुमच्या शरीराला खूप फायदेदेखील होतात. मासे हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. कारण त्यात ओमेगा-३ फॅटी अॅसिड, प्रथिने, व्हिटॅमिन डी आणि अनेक आवश्यक पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. पण जास्त प्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जर तुम्ही जास्त मासे खाल्ले तर त्याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात. जास्त मासे खाणे हानिकारक का आहे ते जाणून घेऊया?

पाऱ्याचे प्रमाण अधिक :

ट्यूना, स्वॉर्डफिश आणि शार्क सारख्या मोठ्या समुद्री माशांमध्ये पाराचे प्रमाण जास्त असते. जास्त प्रमाणात पारा शरीरात जमा होऊ शकतो आणि मुलांमध्ये न्यूरोलॉजिकल समस्या, स्मरणशक्ती कमी होणे, डोकेदुखी, नैराश्य आणि वाढ खुंटणे अशा समस्या निर्माण करू शकतो. गर्भाच्या मेंदूच्या विकासावर परिणाम करू शकते त्यामुळे गर्भवती महिलांसाठी धोकादायक ठरू शकतो.

अन्न विषबाधा होण्याचा धोका

खराब झालेले किंवा दूषित मासे खाल्ल्याने बॅक्टेरियाचा संसर्ग होऊ शकतो. यामुळे पोटदुखी, उलट्या, अतिसार आणि ताप यासारखी लक्षणे दिसू शकतात. कच्चे किंवा कमी शिजवलेले मासे खाणाऱ्यांमध्ये हा धोका जास्त असतो.

ओमेगा-3

माशांमध्ये आढळणारे ओमेगा-३ फॅटी अॅसिड हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले असते परंतु जास्त प्रमाणात रक्त पातळ होऊ शकते. यामुळे कापलेल्या किंवा दुखापतीच्या बाबतीत रक्तस्त्राव होण्याची शक्यता वाढते आणि बरे होण्यासाठी वेळ लागतो.

मासे खाताना कोणती काळजी घ्यावी :

आठवड्यातून 2 ते 3 पेक्षा अधिक काळ सेवन करु नये

छोटी आणि पारा कमी असणाऱ्या माश्यांचे सेवन करु नये

मासे व्यवस्थित शिजवावेत.

गर्भवती महिलांनी मासे कमी प्रमाणात खावेत

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा