लाईफ स्टाइल

Fashion Tips: जर तुम्ही लग्नासाठी दागिने खरेदी करणार असाल तर 'या' अभिनेत्रींचे लूक नक्की पहा

लग्नाचा हंगाम सुरु झाला आहे. प्रत्येक नववधूला वाटते कीआपल्या या खास दिवशी आपण खुप सुंदर दिसावे.

Published by : shweta walge

लग्नाचा हंगाम सुरु झाला आहे. प्रत्येक नववधूला वाटते कीआपल्या या खास दिवशी आपण खुप सुंदर दिसावे. त्यासाठी त्या काही महिन्या अगोदर पासून कपडे, दागिने, सॅडेल आणि मेकअपची खरेदी करण्याची तयारी करतात. सुंदर दिसण्यासाठी काय घालावे, कोणत्या ड्रेसवर कोणते दागिने जातील यासाठी मुली खूप मेहनत घेतात. जर तुमचे लग्नही जवळ आले असेल आणि तुम्ही स्वतःसाठी लग्नाचे दागिने खरेदी करणार असाल. तर एकदा या अभिनेत्रींच्या लग्नातील लूक बघाच. जे पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या लूकसाठी अनेक कल्पना मिळतील.

दीपिका पदुकोण

जर तुम्हाला हेवी ज्वेलरी आवडत असेल तर तुम्ही दीपिका पदुकोणच्या वेडिंग लूकवरून टिप्स घेऊ शकता. दीपिकाने तिच्या लग्नात रेड कलरच्या लेहग्यासोबत खास ज्वेलरी निवडली होती. ज्यात जड कानातल्यांसह जड नेकपीसचा समावेश होता सोबतच माथापट्टीही घातली होती जी तीच्यावर खुप सुंदर दिसत होती. तुमचा लुक खास बनवण्यासाठी तुम्ही दीपिकाची ही ज्वेलरी घालू शकता. जर तुम्ही लेहेंग्याऐवजी साडी नेसणार असाल तर या प्रकारच्या दागिन्यांमुळे लग्नात तुमच्या वधूच्या लुकमध्ये भर पडेल.

कतरिना कैफ

कतरिना कैफचा वेडिंग लूक ट्रेंडमध्ये असू शकतो. ब्राइडल लूकसाठी कतरिनाने गोल्ड चोकर नेकपीस घातला होता. ज्यामध्ये तीने कस्टमाईज्ड कलेरे आणि दुहेरी कपाळाची पट्टी घातली होती. अशा प्रकारच्या दागिन्यांचा सेट तुम्ही बाजारातून खरेदी करू शकता. हे सहज उपलब्ध होतील. त्याचबरोबर हातातील बांगडी संपूर्ण लुकचे सौंदर्य वाढवत होती.

यामी गौतम

यामी गौतमच्या लग्नासाठी तिने अतिशय साधा लूक निवडला होता. ज्यामध्ये तीच्या सोन्याच्या दागिन्यांचा समावेश होता. गोल डिझाईनची मांगटिकासह सोन्याचे झुमके आणि सोन्याचे चोकर नेकपीस खूपच सुंदर होते. दुसरीकडे यामी गौतमचा नथ तिच्या लूकमध्ये आकर्षक दिसत होता. ज्यासोबत लाल रंगाची बांगडी आणि काळेरे जुळले होते. लग्नासाठी या प्रकारातील सोन्याचे दागिने अतिशय आकर्षक दिसतील.

तुम्ही स्वत:साठी दागिने खरेदी करणार असाल तर लक्षात ठेवा की दागिने तुमच्या पेहरावाशी जुळले पाहिजे. लेहेंगा किंवा साडी नेसली तरी त्याचा रंग आणि एम्ब्रॉयडरी जुळली तर लुक अजून सुंदर दिसेल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Meenatai Thackeray Statue : मीनाताईं ठाकरेंच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने लाल रंग फेकला; पोलिसांकडून तपास सुरू

Latest Marathi News Update live : मीनाताईं ठाकरेंच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने लाल रंग फेकला; पोलिसांकडून तपास सुरू

Devendra Fadnavis : मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी गोंधळ; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

Raj Thackeray : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरुन व्यंगचित्र काढत राज ठाकरेंची टीका