Fig Benefits | Fig Benefits For Men team lokshahi
लाईफ स्टाइल

Fig Benefits : अंजीराचे पुरुषांसाठी आश्चर्यकारक फायदे

अंजीर खाल्ल्याने पुरुषांना होतील असे फायदे

Published by : Team Lokshahi

Fig Benefits For Men : धावपळीच्या या जीवनात पुरुषांच्या जबाबदाऱ्याही पूर्वीपेक्षा अधिक वाढल्या आहेत, ज्यामुळे ते अनेकदा स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊ शकत नाहीत. निरोगी आहार घेणे खूप महत्वाचे आहे अन्यथा पुरुषांवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. GIMS हॉस्पिटल, ग्रेटर नोएडा येथे कार्यरत असलेल्या प्रसिद्ध आहारतज्ञ डॉक्टर म्हणतात की, जर पुरुषांनी दररोज अंजीर खाल्ल्यास एक नाही तर अनेक फायदे मिळू शकतात. (fig benefits for mens health anjeer belly fat burning tips heart attack digestion constipation)

अंजीर खाल्ल्याने पुरुषांना असे फायदे होतील

बद्धकोष्ठतेपासून आराम मिळेल

अंजीर हे असेच एक फळ आहे जे फायबरचा समृद्ध स्रोत मानले जाते. याचे नियमित सेवन केल्याने पचनाच्या समस्या दूर होतात. ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांनी अंजीर खाणे आवश्यक आहे कारण ते आतड्यांसंबंधीच्या समस्या दूर करते.

वजन कमी करण्यासाठी प्रभावी

अंजीरमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने आणि त्यामुळे पचनसंस्था निरोगी राहते आणि ते खाल्ल्याने जास्त वेळ भूक लागत नाही, अशात कमी आहार घेतल्याने वजन हळूहळू कमी होऊ लागते.

हृदयरोग प्रतिबंधक

भारतात हृदयविकाराने ग्रस्त लोकांची संख्या खूप जास्त आहे, ज्यामध्ये पुरुषही मोठ्या संख्येने आहेत. पुरुष अनेकदा कामासाठी घराबाहेर राहतात आणि जास्त तेलकट पदार्थ खातात, अशात उच्च कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. अँटिऑक्सिडंट्स युक्त अंजीर फळ खाणे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते कारण ते रक्तदाब नियंत्रित करते.

असे खा अंजीर

अंजीर खाण्याचे अनेक प्रकार आहेत. हे कच्चे आणि शिजवलेले सेवन केले जाऊ शकते. मात्र, ते सुकवून ड्रायफ्रुट्ससारखे खाण्याचा ट्रेंड अधिक आहे. जर पुरुषांना या फळाचा जास्तीत जास्त फायदा मिळवायचा असेल तर अंजीर रात्री पाण्यात भिजवून ठेवावे आणि सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी ते खावे. काही लोक रात्री झोपण्यापूर्वी ते दुधात मिसळून पितात.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Rauat : "हे सरकार म्हणजे हवा भरलेले फुगे"; विजयी मेळाव्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Uddhav Thackeray on Devendra Fadanvis : आंतरपाट दूर करणारे अनाजी पंत म्हणत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर थेट निशाणा

Sanjay Shirsat On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "पडझड ही उबाठा गटाची झाली, राज ठाकरेंची नाही"

Raj Thackeray On Devendra Fadnavis : "माझे वडील आणि काका इंग्रजीत शिकले पण..." फडणवीसांच्या टीकेला राज ठाकरेंकडून सडेतोड उत्तर