Flat Stomach Tips Team Lokshahi
लाईफ स्टाइल

Flat Stomach Tips | या व्यायामाने एका आठवड्यात पोटाची चरबी होणार कमी

योग्य आहारासोबत व्यायाम केल्याने त्याचा शरीरावर चांगला परिणाम होऊ शकतो

Published by : shweta walge

बाहेर निघालेल्या पोटाला बघून एक वेगळ्याच प्रकारचे टेंशन होते. आहारात आवश्यक ते बदल आणि कमी करूनही त्याचा परिणाम दिसायला बराच वेळ लागतो. पण जर योग्य आहारासोबत व्यायाम केल्याने त्याचा शरीरावर चांगला परिणाम होऊ शकतो. योग्य व्यायाम नियमित केल्याने त्याचा तुम्हाला परिणाम काही हफ्त्यात दिसून येईल.

1. रशियन ट्विस्ट (Russian twist)

  • सर्वप्रथम, जमिनीवर बसून, गुडघे वाकवून पाय जमिनीपासून किंचित वर करा. म्हणजे हिप्सवर बसणे.

  • यानंतर, आपल्या दोन्ही हातांनी एक बॉल पकडा किंवा हात जोडून घ्या.

  • आता शरीराचा वरचा भाग हातांनी आधी डावीकडे आणि नंतर उजवीकडे फिरवा. ते किमान 10-15 वेळा करा.

2. प्लँक (Planck)

  • जमिनीवर कोपर घालून झोपा. पोटावर झोपा

  • -यानंतर,पायांचे बोटे आणि हाताच्या कोपरांच्या मदतीने, संपूर्ण शरीर वर उचला.

  • काही वेळ या स्थितीत राहा आणि हळू हळू श्वास आत घ्या.

3. सिट अप्स (Sit ups)

  • सिट-अप करण्यासाठी, प्रथम आपल्या पाठीवर झोपा. यानंतर तुमचे गुडघे अशा प्रकारे वाकवा की तुमचे पाय सरळ जमिनीवर येतील.

  • तुमचे दोन्ही हात तुमच्या कानामागे किंवा तुमच्या डोक्याजवळ ठेवा आणि हळूहळू तुमचे शरीर वर करा. हा व्यायाम करताना लक्षात ठेवा की तुमच्या शरीराचा खालचा भाग पूर्णपणे जमिनीला चिकटलेला असावा.

  • त्याचप्रमाणे हळू हळू वरचा भाग उचला आणि नंतर खाली घ्या. त्यामुळे पोटावर दाब जाणवेल. हे शक्य तितक्या वेळा करा, ब्रेक घ्या आणि पुन्हा करा.

4. बोट पोझ (Boat pose)

  • बोट पोझ करण्यासाठी हिप्सवर बसावे.

  • दोन्ही पाय वर करून सरळ करा. हात समोर ठेवा आणि बोटांवर डोळे ठेवा.

  • काही सेकंद या स्थितीत रहा. आराम करा आणि पुन्हा पुन्हा करा. हे किमान 5-7 वेळा करा.

5. कोब्रा स्ट्रेच (Cobra Stretch)

  • तुम्ही पोटाच्या भागावर जमिनीवर झोपा.

  • नंतर हातावर वर उठण्याचा प्रयत्न करा.

  • जास्तीत जास्त डोकं वर करून पोटावर भार टाका.

  • हा व्यायाम करताना दोन्ही पायांमध्ये कमीत कमी अंतर असेल याची काळजी घ्या.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Amit Shah Pune : "बाजीराव पेशवेंनी 40 वर्षाच्या आयुष्यात..." पुण्यात शाहांकडून पेशवांच्या शौर्यावर भाष्य

Home Loan Intrest Rate : गृहकर्जदारांना दिलासा ! PNB, Indian Bank आणि Bank Of India ने केली व्याजदरात कपात

Latest Marathi News Update live : परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Resham Tipnis : लेकाचा फोटो वापरल्याने एकच गोंधळ, अभिनेत्री संतापली म्हणाली की, 'ज्याने हे वाईट...'