लाईफ स्टाइल

Overeating : अतिखाण्यापासून स्वतःला असे रोखा ; फॉलो करा सोप्या Tips

त्यामुळे आपण काय खातो? किती खातो? याबद्दल लोक फारसे लक्ष देत नाहीत.

Published by : Shamal Sawant

भूक लागली की आपण अनेकदा अतिप्रमाणात (Overeating )अन्नाचे सेवन करतो. मात्र हे अति खाणे तुम्हाला आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. सध्याचे धावपळीचे जीवन आणि बदललेले राहणीमान यामुळे आरोग्यासाठी पुरेसा वेळ देता येत नाही. त्यामुळे आपण काय खातो? किती खातो? याबद्दल लोक फारसे लक्ष देत नाहीत. या सगळ्याचा तुमच्या शरीरावर विपरीत परिणामदेखील होतो. त्यामुळे ओव्हरइटींग टाळण्यासाठी काही टिप्स आपण जाणून घेऊया.

सध्या ऑफिसमध्ये बसून खाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तसेच कामाच्या वेळादेखील ठरलेल्या नसतात. त्यामुळे अचानक काही समोर आल्यास आणि प्रचंड भूक लागल्यास जे मिळेल त्याचे अति प्रमाणात सेवन के जाते. त्यामुळे पोट सुटण्याच्या समस्या, फॅटी लिव्हर, हृदय आणि मानसिक आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसून येत आहे. मात्र हे टाळायचे असल्यास काही सोपे उपाय आहेत. त्याबद्दल आता माहिती घेऊया.

ताटात कमी जेवण घ्या :

जेवणाच्या वेळी अनेकदा ताटामध्ये एकाच वेळी अधिक प्रमाणात जेवण वाढून घेतले जाते . त्यामुळे पोट भरल्यानंतरही ताटातील अन्न संपेपर्यंत खात राहतो. त्यामुळे गरजेपेक्षा अधिक अन्नाचे सेवन केले जाते. त्यामुळे सुरुवातीलाच प्लेटमध्ये कमी जेवण घ्या. त्यामुळे जर तुम्हाला जेवण कमी पडले तर पुन्हा जेवण घेता येते.

जेवताना टीव्ही किंवा मोबाइल बघणे टाळा :

जर तुम्ही जेवण करताना टीव्ही किंवा मोबाइल बघत असाल तर किती जेवण खात आहात? हे लक्षात येत नाही. त्यामुळे जेवताना नेहमी शांत मनाने जेवा. यामुळे तुम्ही जेवणाचा आस्वाददेखील घेऊ शकता.

जेवणाआधी पाणी प्या :

जर तुम्हाला सतत काही ना काही खायची इच्छा होते. ही भूक टाळण्यासाठी तुम्ही पाणी पिऊ शकता. त्यामुळे जेव्हा तुम्हाला अवेळी भूक लागेल तेव्हा त्यावेळी ग्लासभर पाणी प्या. यामुळे तुमचे वजन कमी होण्यासही मदत होते.

जेवणाची वेळ निश्चित करा :

जेवणासाठी तुम्ही एक निश्चित वेळ ठेवणे गरजेचे आहे. यामुळे तुमच्या शरीराला जेवण मिळण्याची एक वेळ ठरेल आणि त्यानुसार चयापचय संस्था कार्यरत राहील.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 IND vs PAK Live Update : पाकिस्तानची टोळी 127 धावांवर बाद, भारतासमोर 128 धावांचे आव्हान

PM Narendra Modi On Congress : “मी शिवाचा भक्त, विषही प्राशन करेन” पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींंना दागिने खरेदी करण्यासाठी उत्तम योग, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार