लाईफ स्टाइल

मासिक पाळी दरम्यान अशी घ्याल काळजी

मासिकपाळी दरम्यान बहुतांश महिलांना अनेक प्रकारच्या त्रासातून जावं लागतं

Published by : Team Lokshahi

मासिकपाळी दरम्यान बहुतांश महिलांना अनेक प्रकारच्या त्रासातुन जावं लागतं. त्यातच विशेषता पोटदुखी, कंबरेच दुखणं , डोकेदुखी, ईत्यादी.. सारख्या त्रासाच्या असाह्य वेदना सहन कराव्या लागतात, पाळी दरम्यान फक्त शारिरिकच, नाही तर मानसिक त्रास देखील खुप होतो जसे कि सतत बदलणारे मुड स्विंगस्, पाळी दरम्यान होणारी चिडचिड, राग ई.

मासिक पाळी दरम्यान मुलींचे मुड स्विंगस् होत असतात कधी खुप आनंदी वाटत तर कधी अचानक चिड चिड होऊ लागते आणि अशा काळामध्ये योग्य तो आहार न घेणं हे देखील या समस्या वाढण्यामागच एक मोठ कारण असू शकतं.

त्यामुळे पाळी दरम्यान काही पदार्थना टाळून योग्य पदार्थांचा आहारात समावेश करणं खुप महत्वाचे असते. कारण तेव्हा आपल्या शरीरामध्ये अनेक बदल होत असतात जितकं रक्त शुद्ध होतं तितकच ते कमी देखील होत असत. त्यातच योग्य आहार नसल्यास तब्येतीवर परिणाम होऊ शकतो व वेदना वाढू देखील शकतात. म्हणूनच, मासिक पाळीच्या दरम्यान तुम्ही खालील महत्वाच्या पोषक तत्वांचे आहारात समावेश केला पाहिजे.

तुमच्या मासिक पाळीत खाण्यासारखे पदार्थ ;

सॅल्मन ; म्हणजेच (रावस) फक्त रावसच नाही तर इतरही असे काही मासे आहेत जे लोहयुक्त असतात. रावसमध्ये भरपुर प्रमाणात लोह असल्यामुळे त्याचं मासिक पाळीच्या काळात सेवन केल्याने शरीराला आराम मिळतो. व्हिटॅमिन बी साठी देखील हा एक उत्तम पर्याय आहे .

डार्क चॉकलेट ; चॉकलेट खाण्यासाठी आपल्याला कदाचित दुसऱ्या निमित्ताची गरज नाही.चॉकलेट हे सर्वात लोकप्रिय पदार्थांपैकी एक आहे. अँटिऑक्सिडंट्स आणि मॅग्नेशियमने भरलेले, गडद चॉकलेट हे एक उत्तम आरामदायी पदार्थ आहे. जंग फूड किंवा इतर कुठल्याहि बाहेरच्या पदार्थांपेक्षा डार्क चॉकलेट हा पाळी दरम्यान खाण्यासाठी एक चांगला पर्याय आहे.

ओटमील ; ओट्स हे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन 'ए' आणि 'ब' ने समृद्ध असलेले संपूर्ण धान्य आहे आणि ते लोहाचे उत्तम स्रोत देखील आहे. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की ओटमीलचे योग्य प्रमाणात सेवन केल्याने पीएमएसच्या (PMS) म्हणजे प्रीमेनस्ट्रुअल सिंड्रोम लक्षणांचा धोका कमी होतो. तुमचे पोट खराब असेल तर ओटमील हा एक उत्तम पर्याय आहे.

टरबूज, अंजीर आणि मनुका ; या पदार्थांमध्ये नैसर्गिक साखर आढळते. हि पदार्थं इतर साखरयुक्त पदार्थांच्या तुलनेत फायदेशीर पदार्थ आहे, तसेच ह्या पदार्थां मध्ये भरपुर प्रमाणात व्हिटॅमिन आढळून येतात. टरबूजमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ते तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवण्यात मदत करते, ज्यामुळे हातापायाला सूज किंवा सांधे दुखी कमी होते.

संत्री, आणि लिंबू ; हे शर्करायुक्त पदार्थ आहेत आणि एक स्मार्ट पर्याय आहे जे फायबर आणि व्हिटॅमिन सी ने भरलेले आहे ज्यामुळे मूड स्विंग आणि सतत होणार्‍या चिडचीडपासून आराम मिळतो दरम्यान, त्यांच्यातील उच्च पाण्याचे प्रमाण देखील आपल्याला हायड्रेटेड ठेवते.

अंडी ; अंड्यातील पिवळा भागामध्ये लोह, चरबी-विरघळणारे पोषक, व्हिटॅमिन बी , आवश्यक फॅटी ऍसिडस् परंतु जर तुमचे पोट संवेदनशील असेल तर, उकळलेली अंडी टाळा, ज्यामुळे गॅस, आणि छातीत जळजळ होऊ शकते.

मासिक पाळी दरम्यान हे पदार्थ टाळा..

मासिक पाळीच्या दरम्यान व्हिटॅमिन , पाणी, लोह आणि फायबर यांसारखे भरपूर पोषक असलेले पदार्थ निवडा.

प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ ; म्हणजेच बाहेर कॅन केलेला खाद्यपदार्थ, मोठ्या प्रमाणात प्रक्रिया केलेले मांस आणि कॅमिकल्सने बनवलेल्या इतर वस्तू ,मासिक पाळी दरम्यान खाणं टाळा. सोडियमची उच्च पातळी महिन्याच्या कोणत्याही वेळी चांगली नसते, परंतु ते तुमच्या पाळी दरम्यान आणखी नुकसान करतात.

दारू (एल्कोहॅा) ; तुमची मासिक पाळी सुरू असताना, अल्कोहॅालयुक्त पेये कमी करा.यावेळी रक्त कमी झाल्यामुळे तुमचा रक्तदाब कमी होतो, ज्यामुळे तुम्हाला अल्कोहोलच्या दुष्परिणामांची अधिक शक्यता असते.

तीखट पदार्थ ; डोकेदुखी, पोटदुखी,मुडस्विंगस् सारख्या गोष्टींनी त्र्यस्त असल्यामुळे त्यात तीखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे जास्त त्रास होण्याची शक्यता असते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Trade Deal Ith America : "राष्ट्रीय हित हेच आमचं सर्वोच्च" ; अमेरिकासोबत व्यापार कराराबाबत पीयूष गोयल यांचे स्पष्टविचार

Chhatrapati Sambhajinagar : विठ्ठल-रुक्मिणीच्या पदस्पर्शाने पावन झालेले 'छोटे पंढरपूर'; वाळूजजवळील भाविकांचे श्रद्धास्थान

Pratap Sarnaik : 'अमराठींसाठी मोफत मराठी शिकवणी', मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Amravati News : अंधश्रद्धेचा कहर! 10 दिवसांच्या चिमुकल्याला गरम विळ्याचे 39 चटके अन्...