Body Protein Team Lokshahi
लाईफ स्टाइल

दररोज जिममध्ये जाताय ? मग आहारामध्ये करा या प्रोटीनचा समावेश...

शरीरयष्टीसाठी अनेकांना जिममध्ये जायला अधिक आवडतं.

Published by : prashantpawar1

आजच्या काळात अनेकांना स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी जिममध्ये जाणे आवडते. जिमला जात असेल तर जिमच्या ट्रेनरने दिलेला आहार पाळा. आम्ही तुम्हाला सांगतो की जे लोक वर्कआउट करतात त्यांचा आहार चांगला असतो. त्यांचे शरीर अधिकाधिक अन्नाची मागणी करते. आज जाणून घेऊयात की अशा परिस्थितीत तुम्ही असा आहार घ्यावा ज्याचा तुमच्या शरीराला फायदा होईल.

अंडी
अंडी हे आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. त्यात जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. रोज एक अंडे खाण्याचा सल्लाही डॉक्टर देतात. अंडी हा प्रोटीनचा खूप चांगला स्रोत आहे. तसेच व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत असलेले अंडे एकीकडे शरीरातील कॅलरीज वाढवून तसेच प्रोटीनची कमतरता दूर करते. अनेकदा जिममध्ये जाणारे 4-6 अंडी त्यांच्या आहारात समाविष्ट करतात.

केळी
केळी अनेकांना आवडते. जीवनसत्त्वे आणि प्रथिने व्यतिरिक्त केळीमध्ये अनेक पोषक घटक असतात. शारीरिकदृष्ट्या कमकुवत लोकांना केळी खाण्याचा सल्ला दिला जातो. केळी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे म्हणूनही आश्चर्यकारक काम करते. केळी कार्बोहायड्रेट्सचाही चांगला स्रोत आहे. चविष्ट असण्यासोबतच भूक, तहान दूर करणारे, शरीर वाढवणारे, देहसंवर्धन करणारे फळ आहे. दुधासोबत खाल्ल्यास जास्त फायदा होईल.

बीट
जीममध्ये नियमित वर्कआउट करणाऱ्यांसाठी बीटचा रस खूप फायदेशीर आहे.

मसूर
जे लोक जिम किंवा वर्कआउट करतात त्यांनी त्यांच्या आहारात तृणधान्ये विशेषतः डाळींचा समावेश करावा. ते प्रथिने कार्बोहायड्रेट्स आणि फायबरचे सर्वात मोठे स्त्रोत आहेत. हे तुमचे स्नायू वाढवण्यास आणि मजबूत करण्यास मदत करते. आहारात अधिकाधिक धान्यांचा समावेश करा.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा